अबब! १९७ कोटी रोकड, २३ किलो सोनं आणलं कुठून?; पीयूष जैनच्या चौकशीचा फास आवळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 03:59 PM2022-05-29T15:59:15+5:302022-05-29T15:59:52+5:30

डीजीजीआयनं याआधीच पीयूष जैन याच्या घरावर छापा मारला होता. जैन याच्या कानपूरच्या आनंदपुरी येथील घरातून तसेच कन्नोज येथील कोठीतून १९७ कोटी रोकड जप्त करण्यात आली

197 crore cash, 23 kg gold brought from where ?;Investigations against Piyush Jain reopen | अबब! १९७ कोटी रोकड, २३ किलो सोनं आणलं कुठून?; पीयूष जैनच्या चौकशीचा फास आवळणार

अबब! १९७ कोटी रोकड, २३ किलो सोनं आणलं कुठून?; पीयूष जैनच्या चौकशीचा फास आवळणार

googlenewsNext

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता पीयूष जैन याच्यावर तपास यंत्रणांनी नवीन जाळं टाकलं आहे. ज्यामुळे जैन यांच्या घरात सापडलेले १९७ कोटी रोकड जप्त होऊ शकते. त्यासोबतच पीयूष जैन यांना मोठी रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. आतापर्यंत पीयूष जैनवर डीजीजीआय अहमदाबाद आणि डीआरआय लखनौ यांच्या तपास पथकाने चौकशी केली आहे. 

डीजीजीआयनं याआधीच पीयूष जैन याच्या घरावर छापा मारला होता. जैन याच्या कानपूरच्या आनंदपुरी येथील घरातून तसेच कन्नोज येथील कोठीतून १९७ कोटी रोकड जप्त करण्यात आली. कन्नोज येथील घरातून मोठ्या प्रमाणात सोनेही सापडले. २३ किलो सोने सापडल्यामुळे डीआरआय लखनौच्या पथकाने या प्रकरणाची वेगळी चौकशी लावली आहे. आयकर खात्याचे तपास अधिकारी संचालक विजय सिंह यांनी डीजीजीआय अहमदाबादकडून नोटा जप्तीप्रकरणी रेकॉर्ड घेतला आहे. 

त्यानंतर कानपूर सीजीएम स्नेहा कुमारी यांनी आयकर कायदा १९६१ अंतर्गत पीयूष जैनची जेलमध्ये चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्यापासून आतापर्यंत पीयूष जैन जेलमध्येच आहे. व्हर्चुअलच्या माध्यमातून कोर्टात सुनावणी केली जाते. सामान्य आणि जिल्हा कोर्टाने पीयूष जैन यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. विशेष पथकाने पीयूष जैनची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता आयकर खात्याचे तपास अधिकारी पीयूष जैनकडे सापडलेल्या पैशाबाबत चौकशी करत आहेत. 

आयकर विभागाच्या सूत्रांनुसार, पीयूष जैन तपासातील प्रश्नांना योग्य उत्तरं देत नाही. कारण याआधी पीयूष जैनने जप्त करण्यात आलेला पैसा त्याचाच असल्याची कबुली कोर्टात दिली आहे. त्याचा दंडही तो भरण्यास तयार आहे. परंतु हे पैसे आले कुठून? त्यावर आयकर भरला की नाही याबाबत तपास अधिकारी माहिती काढत आहेत. हा पैसा पीयूष जैनच्या गळ्यातील फास आवळणार असून कारण तो आणला कुठून याची माहिती त्याला द्यावी लागेल. पैसा, सोने जप्त होईलच पण त्याबरोबर दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागेल.    
 

Web Title: 197 crore cash, 23 kg gold brought from where ?;Investigations against Piyush Jain reopen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.