NCBच्या कारवाईची चर्चा असताना मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये; डोंगरीत मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:57 PM2021-10-06T16:57:18+5:302021-10-06T16:59:25+5:30
दक्षिण मुंबईतील डोंगरीमध्ये अँटी नार्कोटिक्स विभागाची मोठी कारवाई
मुंबई: एनसीबीनं दोनच दिवसांपूर्वी क्रूझवर कारवाई केली. क्रूझवर सुरू असलेली ड्रग पार्टी उधळत एनसीबीनं आठ जणांना अटक केली. यामध्ये अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. एनबीसी कारवाई करत असताना मुंबई पोलीस काय करत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं डोंगरी परिसरातून ५ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल १५ कोटी इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ते राजस्थानचे असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिली. दोन्ही आरोपी राजस्थानहून मुंबईला आले होते. ते काही ग्राहकांना अंमली पदार्थ विकणार होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
Two persons have been arrested by the Anti-Narcotics Cell of the Mumbai crime branch. Police seized 5 kg of heroin worth Rs 15 crores from the Dongri area of Mumbai. Both accused belongs to Rajasthan:
— ANI (@ANI) October 6, 2021
Mumbai Police Commissioner Hemant Nagrale pic.twitter.com/8nK1p0Gogp
राजस्थानमधून दोघे जण हेरॉईंन विकण्यासाठी आल्याची माहिती मुंबई पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. या टिपच्या आधारे दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना दोघांकडे पाच किलो हेरॉईन सापडलं. त्याची बाजारातील किंमत १५ कोटी रुपयांच्या घरात आहे.