सीमा शुल्क विभागाकडून २ कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:01 PM2020-06-25T19:01:20+5:302020-06-25T19:04:52+5:30

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार जणांना अटक

2 crore 10 lakh drugs seized from customs department | सीमा शुल्क विभागाकडून २ कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त

सीमा शुल्क विभागाकडून २ कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त

Next
ठळक मुद्देनळदुर्ग -सोलापूर रोडवर कारवाई : चौघांना अटक

पुणे : सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थाचा साठा नळदुर्ग - सोलापूर रस्त्यावर पकडला आहे.या कारवाईत कस्टमने चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ कोटी १० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
याबाबत सीमा शुल्क विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातून गांजा आणि चरस अशा अमली पदार्थाचा साठा महाराष्ट्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या पथकाने आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येणाºया रस्त्यावरील बोरमणी गावाजवळ दोन ट्रक संशयावरुन थांबविण्यात आले. कस्टमच्या पथकाने ट्रकची तपासणी केली.तेव्हा ट्रकमध्ये पोत्यात भरलेला गांजा आढळून आला. तसेच दुसऱ्या ट्रकमध्ये सात किलो चरस सापडला. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ४ लाख रुपयांचा ८५८ किलो गांजा व ७५ लाख रुपयांचा साडेसात किलो चरस याचा समावेश आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ महाराष्ट्रात कोणाला पाठविण्यात येत होते, याची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: 2 crore 10 lakh drugs seized from customs department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.