खड्या पहाऱ्यातून २ कोटीचे केबल चोरीला; गुन्हेशाखेने चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांचे गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:26 PM2019-12-21T12:26:11+5:302019-12-21T12:39:44+5:30

१ कोटी ८३ लाखांचे केबल चोरी प्रकरण 

2 crore cable was stolen from the cliffs; The crime was reported by police after the crime branch caught the thieves | खड्या पहाऱ्यातून २ कोटीचे केबल चोरीला; गुन्हेशाखेने चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांचे गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार

खड्या पहाऱ्यातून २ कोटीचे केबल चोरीला; गुन्हेशाखेने चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांचे गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देकरमाड पोलिसांची भूमिका संशयास्पदपोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

करमाड : डीएमआयसीचा विकास करणाऱ्या शेंद्रा परिसरातील शापूरजी पालनजी कंपनीच्या गोडाऊनमधील १ कोटी ८३ लाख रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनिअम केबल पळविणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्यानंतर करमाड पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार पार पाडले. यानंतर आजारी रजा टाकून गायब झालेल्या करमाड ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली.

सुरक्षारक्षकांचा २४ तास खडा पहारा असलेल्या शापूरजी पालनजी कंपनीच्या गोडाऊनमधील १ कोटी ८३ लाख रुपये किमतीची व ४० टन वजनाची अ‍ॅल्युमिनिअम केबल असलेले १९ ड्रम १८ नोव्हेंबर रोजी रात्री पाच ट्रकमधून क्रेनच्या मदतीने पळविण्यात आले. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार नोंदविली नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सय्यद ऊर्फ पप्पू जमालोद्दीन गफार सय्यद आणि शेख अझहर शेख फतरू  यांना वाळूज परिसरात पकडले होते. तेव्हा त्याने शापूरजी पालनजी कंपनीतून कोट्यवधी रुपये किमतीची केबल चोरी केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पकडल्याचे समजताच करमाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अजिनाथ रायकर यांनी कंपनी व्यवस्थापक वसीम शेख याला बोलावून घेऊन त्याच्याकडून ७ लाख रुपये किमतीची केबल चोरीची फिर्याद लिहून घेतली. यानंतर ते आजारी रजा टाकून गायब झाले आणि शिवाय चार दिवसांपासून त्यांचा मोबाईल बंद आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पो. नि. रायकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात

तडकाफडकी बदली केली.
सूत्रांच्या माहितीनुसार भंगार खरेदीचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास वाळूज येथील एका ट्रान्सपोर्टमधून ५ ट्रकचा वापर करून कंपनीच्या गोडाऊनमधून अ‍ॅल्युमिनिअमची केबल असलेले ड्रम चोरी केले. हे ड्रम उचलण्यासाठी काही पोलिसांनी बीड बायपास रोडवरून क्रेन उपलब्ध करून दिले होते.

दोषींवर कारवाई होईल
कोट्यवधी रुपयांच्या केबल चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे. यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल. पो. नि. रायकर हे रजेवर गेल्यामुळे करमाड ठाण्याचा कारभार पाहण्यासाठी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याने पोनि. महेश खेतमाळस यांना तेथे पाठविले. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल.    
- मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक

Web Title: 2 crore cable was stolen from the cliffs; The crime was reported by police after the crime branch caught the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.