दोन पती, 5 मुलं, तरीही प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये होती महिला; 1000 रुपयांच्या नादात गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:53 PM2023-06-07T12:53:19+5:302023-06-07T12:54:13+5:30

महिलेने प्रियकरासाठी घेतली होती वेगळी रूम...!

2 husbands, 5 kids, still live with boyfriend lover killed 45 yrs old woman police disclosed guddi murder case accused arrested | दोन पती, 5 मुलं, तरीही प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये होती महिला; 1000 रुपयांच्या नादात गमावला जीव

दोन पती, 5 मुलं, तरीही प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये होती महिला; 1000 रुपयांच्या नादात गमावला जीव

googlenewsNext

गाझियाबादमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने केवळ एक हजरा रुपयांसाठी आपल्याच प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित महिलेने या पूर्वी आपल्या दोन पतींना सोडले होते. तिला पाच मुलेही आहेत. यांपैकी दोन मुलींचे लग्न झाले आहे. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची पुष्टी झाली. यानंतर, पोलिसांनी आरोची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी सोमवारी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील वेव्ह सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीनानाथपूर पूठी गावात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने एक हजार रुपयांच्या नादात प्रेयसीची हत्या केली. आरोपीने 18 मेच्या रात्री एक वाजता महिलेची हत्या केल्यानंतर, आत्महत्येची कहाणी रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये त्याची पोलखोल झाली.

महिलेने प्रियकरासाठी घेतली होती वेगळी रूम -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठच्या नंगला गावात राहणारी 45 वर्षीय गुड्डी दीनानाथपूर पूठीमध्ये जितेंद्र यादव यांच्या घरात राहत होती. ती साबन तयार करणाऱ्या एका फॅक्ट्रीमध्ये काम करत होती. येथे तिची ओळख सिखैडा मुजफ्फरनगर येथील रहिवासी आनंद शर्मासोबत झाली. यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. डिसेंबरपासून ती आनंद शर्मा सोबतच एका भाड्याच्या घरात लिव्ह इनमध्ये राहत होती. यापूर्वी तिने आपल्या दोन पतींना सोडले होते. तिला पहिल्या पतीपासून दोन मुली झाल्या आहेत. ज्यांचे लग्न झाले आहे. दुसऱ्या पतीपासून तिला तीन मुलं झाली आहेत. ती त्यांना स्वतःसोबतच ठेवत होती. तिने एक खोली मुलांसाठी आणि दुसरी खोली आपल्यासाठी आणि आपल्या प्रियकरासाठी ठेवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डी आणि आनंद शर्मा या दोघांनाही दारूचे व्यसन होते. 18 मे रोजी दारू पिल्यानंतर, गुड्डीने माहेरी जाण्यासाठी आनंदकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी आनंदकडे दोन हजार रुपयेच होते. त्याने एक हजार रुपये गुड्डीला दिले. मात्र उरलेले एक हजार रुपये देण्यासाठीही गुड्डी अडून बसली होती. यामुळे त्यांच्यात वाद झाला. वाद सुरू असतानाही दोघांनी दारू प्यायली आणि नॉनव्हेज खाल्ले होते.

तोंड दाबून मारले - 
यानंतर गुड्डीने दाराला गळफास घेऊन आत्महत्येचे नाटक केले. यामुळे आनंद संतापला आणि त्याने गुड्डीची तोंड दाबून हत्या केली.

Web Title: 2 husbands, 5 kids, still live with boyfriend lover killed 45 yrs old woman police disclosed guddi murder case accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.