बारबालांचा डान्स सुरु होता, पब्लिक धांगडधिंगा घालत होती, ट्रकने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:56 PM2022-09-20T22:56:31+5:302022-09-20T22:57:11+5:30
कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ आजुबाजुच्या गावातूनही जमा झाले होते. हा कार्यक्रम रस्त्याच्या शेजारीच आयोजित करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये धक्कादायक अपघात घडला आहे. रस्त्याशेजारी बारबालांचा डान्स पाहणाऱ्या लोकांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
गावातीलच नीरज चंदेल या व्यक्तीने रविवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ आजुबाजुच्या गावातूनही जमा झाले होते. हा कार्यक्रम रस्त्याच्या शेजारीच आयोजित करण्यात आला होता. वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाला रात्रीच्या अंधारात अचानक हा घोळका दिसला. गाण्याच्या ठेक्यावर गावकरी देखील नाचत होते. यामुळे ट्रक चालकाने नियंत्रण गमावले आणि या लोकांना चिरडत पुढे निघून गेला. लोकांनी या ट्रकचा पाठलाग करून ट्रक थांबविला आणि चालकाला व क्लिनरला मारहाण केली.
या अपघातात गावातील लालू साहू याचा जागीच मृत्यू झाला. तक महेश पासवान यांची दहा वर्षांची मुलगी अंशिकाला गंभीर अवस्थेत जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून लखनऊला नेत असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक, क्लिनरला ताब्यात घेतले असून ट्रकही जप्त केला आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.