५ रुपये ठरले जीवघेणे, रिक्षाचालकाची केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 06:25 PM2020-02-26T18:25:09+5:302020-02-26T18:26:54+5:30
या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.
मुंबई - बोरिवली परिसरात एका ऑटो रिक्षाचालकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याने सीएनजी गॅस स्टेशनवरील कर्मचाऱ्याकडे उरलेले ५ रुपये मागितले. त्यानंतर झालेल्या वादातून रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदुलार सरजू यादव (६८) हा मंगळवारी सायंकाळी सीएनजी स्टेशनवर आपल्या ऑटो रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेला होता. तेथून त्याने आपला मुलगा संतोषला फोन केला. २०५ रुपये गॅस भरल्यानंतर यादव यांनी गॅस स्टेशनच्या अटेंडंटला ५०० रुपयांची नोट दिली. त्याने २९५ रुपये परत करण्याऐवजी ५ रुपये कमी दिले आणि २९० रुपये दिले. यावर यादव यांनी आपले शिल्लक असलेले ५ रुपये मागितले त्यावेळी अटेंडंट संतोष जाधवने चालक आणि त्याच्या मुलाशी गैरवर्तणूक केली. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात वयोवृद्ध रिक्षाचालक बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आम्ही या प्रकरणी गॅस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांना भा. दं. वि. कलम ३०२ (हत्या) आणि इतर प्रासंगिक कलमांतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली.
Mumbai: Police have arrested 5 people allegedly for beating a 68-year-old auto-rickshaw driver to death after he asked for his due money, Rs 5 in Borivali. FIR registered and further investigation is underway. #Maharashtra
— ANI (@ANI) February 26, 2020