भीक मागण्यासाठी चिमुकलीचे केले होते अपहरण  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 09:38 PM2019-10-04T21:38:44+5:302019-10-04T21:40:31+5:30

अपहरण करणाऱ्या टोळीतील दोन महिलांना अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

2 years girl was kidnapped for begging; 2 ladies arrested | भीक मागण्यासाठी चिमुकलीचे केले होते अपहरण  

भीक मागण्यासाठी चिमुकलीचे केले होते अपहरण  

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने परभणी येथून गुरुवारी अटक केली. यातील आरोपी महिला ही परभणी येथे असल्याचे आढळून आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिता भोसले, सीमा पवार आणि तिचा मुलगा यांना ताब्यात घेतले.

ठाणे - ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या सीमा पवार (35) आणि अनिता भोसले (30) या दोन महिलांसह एका 11 वर्षीय मुलाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने परभणी येथून गुरुवारी अटक केली. या मुलीला शुक्रवारी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात दिले.
जालना जिल्ह्यातील पिंपळगाव येथील यमुना रोहित नरवडे (35) ही महिला कामाच्या शोधात ठाण्यात आली होती. तिला एक वर्षीय प्रेम हा मुलगा आणि दोन वर्षाची प्राजक्ता ही मुलगी अशी दोन मुले आहेत. कामधंदा आणि जवळ पैसेही नसल्याने यमुना ठाणो पूर्वेकडील रेल्वे स्थानकाच्या  बाजूला असलेल्या मोकळया जागेतच आपल्या मुलांसह राहत होती. दरम्यान,  26  सप्टेंबर 2019 रोजी ती आपल्या मुलांसह रेल्वे स्थानकासमोरील मोकळया मैदानात झोपलेली असतांना पहाटे 1.45 ते  सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखीने तिच्या जवळील दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये तिने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जगदेव यांनी तपासाला सुरवात केली. चौकशीमध्ये या दोन वर्षाच्या बालिकेच्या अपहरणामागे एक महिला आणि तिचा 11 वर्षाच्या मुलाचा हात असल्याची बाब समोर आली. यातील आरोपी महिला ही परभणी येथे असल्याचे आढळून आले. त्याच माहितीच्याआधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या या तपास पथकाने परभणी येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिता भोसले, सीमा पवार आणि तिचा मुलगा यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका केल्यानंतर सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी तिच्या आईच्या ताब्यात देण्यात दिले.

Web Title: 2 years girl was kidnapped for begging; 2 ladies arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.