२० दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 06:03 PM2018-10-03T18:03:16+5:302018-10-03T18:52:45+5:30

देवेंद्र चाळके (वय २२) असं या आरोपीचे नाव असून पोलिसांना त्याने आतापर्यंत २० दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे. यातील ५ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 

20 arrested for stealing a two-wheeler stolen serai thieves from the police | २० दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक  

२० दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक  

Next

मुंबई -  मुंबईच्या काळोख दाटलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस अवघ्या काही सेकंदात दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत दुचाकी चोराला मुंबईच्या एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र चाळके (वय २२) असं या आरोपीचे नाव असून पोलिसांना त्याने आतापर्यंत २० दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे. यातील ५ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 

ताडदेव परिसरातील नवमहाराष्ट्र नगर येथील तुलसीवाडीत राहणारा देवेंद्र आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. परदेशात फिरायला जाण्याची त्याची खूप इच्छा होती. मात्र, घरची आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात होते. यातूनच पैशांच्या हव्यासापोटी तो चोऱ्या करू लागला. दरम्यान १ आॅक्टोंबर रोजी देवेंद्र महालक्ष्मी वर्कशाॅप लोअरपरळ येथे संशयित रित्या फिरत होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केलेले सर्वच गुन्हे कबुल केले. नुकतीच देवेंद्रने माटुंगा परिसरात राहणाऱ्या प्रमोद बिर्जे (वय ५०) यांची एक दुचाकी चोरली होती. देवेंद्र हा दुचाकी चोरून नंतर चोरीच्या गाड्या विकण्यासाठी तो कायम आपली आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी लाखोरुपये खर्च झाले. आता फक्त दुचाकीच उरली आहे. आईवर वैद्यकिय उपचार करणे गरजेचे असल्याचे कारण देत नागरिकांकडून मिळेल ते पैसे घेऊन त्यांना ती चोरीची दुचाकी देऊन पसार होत असे. देवेंद्रविरोधात माहिम, दादर, ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात चोरीच्या कित्येक गुन्हयांची नोंद आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: 20 arrested for stealing a two-wheeler stolen serai thieves from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.