धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं २ वर्षे २० फायर फायटर्सकडून लैंगिक शोषण, महिलेच्या उलगड्याने खळबळ....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 12:57 PM2021-02-08T12:57:42+5:302021-02-08T12:57:52+5:30

महिलेने आरोप केला की, जेव्हा ती केवळ १३ वर्षांची होती तेव्हा तिच्यासोबत पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर २ वर्षे २० फायर फायटर्सनी तिच्यासोबत कधी रेप तर कधी गॅंग रेपही केला.

20 firefighters accused of raping woman in two years when she was minor in paris france | धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं २ वर्षे २० फायर फायटर्सकडून लैंगिक शोषण, महिलेच्या उलगड्याने खळबळ....

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं २ वर्षे २० फायर फायटर्सकडून लैंगिक शोषण, महिलेच्या उलगड्याने खळबळ....

Next

पॅरिसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आरोप लावला की, जेव्हा ती अल्पवयीन होती तेव्हा २० फायर फायटर्सनी तिच्यावर बलात्कार केला होता. २० फायर फायटरने २ वर्षे तिचं लैंगिक शोषण केलं. महिलेच्या या खुलाशानंतर पॅरिसमधील लोक तिच्या समर्थनात समोर आले आहेत.

सध्या पीडितेच्या बलात्काराच्या केसची सुनावणी फ्रान्सच्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. महिलेने आरोप केला की, जेव्हा ती केवळ १३ वर्षांची होती तेव्हा तिच्यासोबत पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर २ वर्षे २० फायर फायटर्सनी तिच्यासोबत कधी रेप तर कधी गॅंग रेपही केला. (हे पण वाचा : अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केला २९ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार)

३ आरोपींचा कबूलनामा

दरम्यान पीडितेच्या आरोपांवर २० पैकी तीन आरोपींनी महिलेसोबत संबंध ठेवल्याची बाब मान्य केली. पण ते म्हणाले की, हे सगळं महिलेच्या मर्जीने झालं होतं. आम्ही तिच्यासोबत बलात्कार केला नाही. पण असंही समोर आलं आहे की, बलात्कारानंतर पीडितेने एका वृत्तपत्रात लिहिले होते की, ती बलात्कारावेळी ती फार घाबरली होती. तिला असं वाटत होतं जणू तिला लकवा मारला आहे. (हे पण वाचा : कहर! ३ व्यक्तींसोबत होते महिलेचे अनैतिक संबंध, पती विरोध करत होता म्हणून पत्नीने केली हत्या....)

कशी झाली शोषणाची सुरूवात

पीडितेने फायर फायटर पियरेवर आरोप लावला आहे की, त्याने एका मेडिकल फाइलमधून तिचा मोबाइल नंबर चोरी केला होता. त्यानंतर तो तिला मेसेज पाठवू लागला. एकदा आरोपी पियरेने पीडितेला वेबकॅमवर कपडे काढण्यासही सांगितले होते. त्यानंतर पियरेने पीडितेचा नंबर इतर साथीदारांना दिला. त्यांनी पीडितेला कपडे काढण्याची मागणी केली.

पीडितेने सांगितले की, जेव्हा ती १३ वर्षांची होती तेव्हा आरोपी पियरे तिला त्याच्या घरी घेऊन गेला होता. तिथे आरोपीने तिच्यासोबत बलात्कार केला. काही वेळाने पियरेचे दोन मित्र तिथे आले. नंतर त्यांनी पीडितेसोबत गॅंगरेप केला. त्यानंतर २ वर्षांपर्यंत हा सगळा प्रकार सुरूच होता. यादरम्यान २० फायर फायटर्सने तिच्यासोबत बलात्कार केला.
 

Web Title: 20 firefighters accused of raping woman in two years when she was minor in paris france

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.