२० लाखांचे लाच प्रकरण, महिला पीएसआय अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:10 AM2020-07-06T03:10:45+5:302020-07-06T03:10:57+5:30
आरोपीवर समाजविरोधी कारवाया प्रतिबंधक कायद्याचे कलम न लावण्यासाठी तिने ही लाच मागितली होती.
अहमदाबाद : बलात्कार प्रकरणातील आरोपीवर समाजविरोधी कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली आरोप न लावण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता जाडेजा हिला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. जाडेजा ही अहमदाबाद (पश्चिम) महिला पोलीस ठाण्याची प्रभारी आहे.
२०१९ मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात केनल शहा याची चौकशी श्वेता जाडेजा ही करीत होती. केनल शहा याच्या भावाकडे तिने ३५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे पोलिसांनी सांगितले. केनल शहा याच्यावर समाजविरोधी कारवाया प्रतिबंधक कायद्याचे कलम न लावण्यासाठी तिने ही लाच मागितली होती. या कलमाखालील आरोपीला पोलीस त्याच्या मूळ जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या तुरुंगात पाठवू शकतात. शहर गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपशिलानुसार श्वेता जाडेजा हिने मध्यस्थामार्फत २० लाख रुपये घेतले आणि केनल शहा याच्याकडे राहिलेले १५ लाख रुपये मागितले. तक्रारदाराने जाडेजा हिला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २० लाख रुपये दिले.
राहिलेल्या रकमेसाठी ती तगादा लावत होती. जाडेला हिला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली. तिला शनिवारी सत्र न्यायालयाने तीन दिवसांच्या कोठडीत पाठवले. पोलिसांनी तिची सात दिवसांची कोठडी मागितली होती, असे सरकारी वकील सुधीर ब्रह्मभट्ट यांनी सांगितले.
पैसे मिळवण्याचे आव्हान
श्वेता जाडेजा हिने घेतलेले २० लाख रुपये परत मिळवणे हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे. तपासामध्ये मध्यस्थाने २० लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे, असे ब्रह्मभट्ट म्हणाले.अहमदाबादमधील क्रॉप सोल्युशन कंपनीचा केनल शहा हा व्यवस्थापकीय संचालक असून, त्याच्यावर बलात्काराचे दोन स्वतंत्र आरोप आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव
साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप