११ महिन्यात दामदुप्पट मोबदल्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक
By नामदेव भोर | Published: March 28, 2023 03:52 PM2023-03-28T15:52:56+5:302023-03-28T15:53:31+5:30
अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासलगाव, ता. निफाड ) व ईशा जयस्वाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
नामदेव भोर
नाशिक : कंपनीत गुंतवणूक केल्यास अकरा महिन्यात दामदुप्पट मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका संशयिताने सातपूरच्या श्रमिकनगर येथील प्रदीप नामदेव मंडळ (रा. ४५, रा. सातमाऊली चौक) यांना सुमारे २० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी (दि.२७) उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंडळ यांनी संशयित, अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासलगाव, ता. निफाड ) व ईशा जयस्वाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अविनाश विनोद सूर्यवंशी व ईशा जयस्वाल यांनी ४ मार्च २०२२ ते २७ मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीत फसवणूक करण्याच्या उद्देशाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास ११ महिन्यात दामदुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रदीप मंडळ यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या अमिषाला बळी पडून मंडळ आणि त्यांच्या नातेवाईकांनी तब्बल २० लाख रुपयांची रक्कम सूर्यवंशी आणि जयस्वाल यांच्या कंपनीत गुंतविली. मात्र ही रक्कम परत न करता तिचा अपहार केल्याने मंडळ यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आर्थिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक शर्माळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.