२० हजारांसाठी भाऊ व आईनेच केले चाकूचे वार, मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 09:54 PM2021-12-05T21:54:28+5:302021-12-05T21:54:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - २० हजार रुपये दिले नाही म्हणून आईनेच मुलाला पकडून ठेवले व दुसऱ्या मुलाने त्याच्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - २० हजार रुपये दिले नाही म्हणून आईनेच मुलाला पकडून ठेवले व दुसऱ्या मुलाने त्याच्यावर चाकूने वार करत मारहाण केल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सलमान नियाज अहमद कुरेशी (२९) रा. पहिली शिफ्टींग , घोडबंदर ह्याने २ डिसेम्बर रोजी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी त्याची आई जमीला व भाऊ जावेद उर्फ जावा रा . म्हाडा बिल्डींग, पेणकरपाडा , चेकनाका जवळ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . सलमान कामावरून घरी परतला असता घरा बाहेर आई जमीला व माझा लहान भाऊ जावेद उर्फ जावा हे दोघे थांबले होते . जावेदने त्याला २० रुपये दे असे सांगितले असता आपल्या कडे सध्या पैसे नसून ते आले कि देतो असे तो म्हणाल . तेव्हा माझी आई जमीला हिने जावेद ला पैसे दे अन्यथा चांगले होणार नाही असे सलमानला धमकावले . त्यावर जावेदने सलमानला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने त्याच्या कमरेच्या मागच्या बाजुने चाकु काढला व सलमानच्या पोटावर, छातीवर वार केले . तर आईने सलमान ह्याला मागून पकडून ठेवले होते व जावेदला ती मार , सोडू नको असे सांगत होती .
सलमान खाली पडल्या नंतर जावेद व आई तेथुन पळुन गेले. बेशुद्ध झालेल्या सलमानला लोकांनी उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .