अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:12 PM2024-10-02T15:12:40+5:302024-10-02T15:15:02+5:30
Drugs Seized in Delhi: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २००० कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
Delhi Crime News: दिल्लीपोलिसांनी कारवाई करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. विशेष पोलीस पथकाने तब्बल दोन हजार कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले आहे. दक्षिण दिल्लीतील कारवाईनंतर हे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
५६५ किलोचे कोकेन
दिल्ली पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल ५६५ किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त केले. या प्रकरणात ४ लोकांना अटक केले आहे. ड्रग्जची किंमत बाजारभावानुसार २ हजार कोटी रुपये सांगण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या लोकांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. ५६५ किलो कोकेन दिल्लीत कशासाठी आले होते? हे ड्रग्ज कोणाला पुरवले जाणार होते? या नेटवर्कमध्ये आणखी कोण-कोण आहे? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या ड्रग्ज नेटवर्क मागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोकेन हे पार्ट्यांसाठी पुरवले जाते, त्यामुळे पोलिसांसमोर याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.