वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:38 AM2020-08-18T11:38:18+5:302020-08-18T11:47:24+5:30
अलीगढच्या पिपल गावातील एका खोलीच्या घरात हवाला रॅकेटमधील कथित आरोपी राहुल (25) याचे आई वडील राहतात. त्यांना याबाबत कळताच मोठा धक्का बसला आहे.
अलीगढ : चिनी नागरिकांच्या मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये खळबळजनक खुलासे होत आहेत. अलीगढचा एक तरुण ज्याची महिन्याची कमाई अवघी दोन हजार रुपये होती, तो दोन चिनी कंपन्यांचा संचालक असल्याचे समोर आले आहे. तसेच अन्य दोन कंपन्यांमध्ये भागधारक आहे. आता खरोखरच हा तरुण यामध्ये गुंतलेला आहे की त्याच्या अपरोक्ष हे कारनामे करण्यात आले आहेत याचा शोध ईडी घेत आहे.
अलीगढच्या पिपल गावातील एका खोलीच्या घरात हवाला रॅकेटमधील कथित आरोपी राहुल (25) याचे आई वडील राहतात. त्यांना याबाबत कळताच मोठा धक्का बसला आहे. जवळपास 1000 कोटींपेक्षा अधिकचे हवाला रॅकेट गेल्या आठवड्यात समोर आले होते. या रॅकेटमधील वॉन्टेड राहुल याचा फोन रविवारपासून बंद येत आहे. यामुळे त्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. यामुळे जेव्हा तपास अधिकारी त्याच्या मूळ घरी पोहोचले तेव्हा त्या घरात वडील श्याम सुंदर यांना माहिती ऐकून धक्काच बसला. स्थानिक अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या दौऱ्य़ाची माहिती नसल्याचे म्हटले आहे.
तपास पथकाने राहुलच्या वडिलांकडे चौकशी केली. त्यांच्यानुसार त्यांचा मुलगा राहुल हा नोएडातील एका कंपनीत काम करत होता. ही कंपनी मोटार स्पेअरपार्टशी संबंधीत होती. यानंतर राहुलने दुसरीकडे पार्ट टाईम नोकरी करण्यास सुरुवात केली, कारण तिथे त्याला जास्त पैसे मिळत होते. मात्र,कंपनीचे नाव माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
राहुलला २ हजार रुपये पगार मिळत होता. तर दुसरीकडे आणखी 2 हजार रुपये दिले जात होते. नवीन नोकरी पकडताना त्याच्याकडून आधार आणि पॅनका़र्ड घेण्यात आले होते. राहुल सध्या दिल्लीत होता, मात्र कुठे राहतो याची कल्पना नसल्याचे शाम सुंदर यांनी सांगितले. राहुलच्या आईने तो निर्दोष असून त्याला यात अडकविण्यात आल्याचे म्हटले आहे. सरकारने त्याला यात मदत करावी अशी मागणीही त्यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Amit Shah Breaking: अमित शहा एम्समध्ये दाखल; श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला
Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग
मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता