2006 Varanasi Blast : तब्बल 16 वर्षांनंतर निकाल आला, दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:10 PM2022-06-06T17:10:23+5:302022-06-06T17:44:54+5:30
2006 Varanasi Blast: या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते.
2006 Varanasi Blast: गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (court) वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. बॉम्बस्फोटांना 16 वर्षांनी हा निर्णय आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावर २००६ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती.
5 एप्रिल 2006 रोजी वाराणसी पोलिसांनी या प्रकरणी अलाहाबादमधील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलीउल्लाला लखनऊच्या गोसाईगंज परिसरातून अटक केली होती. दोषी वलीउल्लाहवर संकट मोचन मंदिर आणि वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यांना आपला कट साध्य करण्यापर्यंत पोहोचवून दहशतवाद पसरवण्याचा आरोप ४ जून रोजी सिद्ध झाला आहे.
वाराणसीच्या वकिलांनी वलीउल्लाहचा खटला लढण्यास नकार दिला होता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गाझियाबाद जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग केले. तेव्हापासून गाझियाबाद येथील जिल्हा न्यायाधीश न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
यापूर्वी 4 जून रोजी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने वलीउल्लाहला दोषी ठरवले होते. यापूर्वी 23 मे रोजी वाराणसी बॉम्ब प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. खटला सुरू होण्यापूर्वी आरोपी वलीउल्लाला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी 4 जूनची तारीख निश्चित करण्यात आली.
खरं तर, 7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि रेल्वे कॅन्टमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. बॉम्बस्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. यासोबतच दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला आहे. संकट मोचन मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटात ७ तर कँट स्थानकात ११ जणांचा मृत्यू झाला होता.
वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. बॉम्बस्फोटांना 16 वर्षांनी हा निर्णय आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावर २००६ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती.