गोंदिया जिल्ह्यातील २१ वर्षीय युवतीवर धावत्या लक्झरी बसमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 04:27 PM2021-01-11T16:27:29+5:302021-01-11T16:33:06+5:30

Girl raped in Luxury Bus युवतीवर आरोपी समिर याने दोन वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले.

21-year-old girl from Gondiya raped in a running luxury bus way to Pune | गोंदिया जिल्ह्यातील २१ वर्षीय युवतीवर धावत्या लक्झरी बसमध्ये बलात्कार

गोंदिया जिल्ह्यातील २१ वर्षीय युवतीवर धावत्या लक्झरी बसमध्ये बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देपिडीत युवती नागपुर येथुन गुडविल ट्रॅव्हल्सने (स्लिपर कोच)  पुणे येथे परत निघाली होती.ट्रॅव्हलचा क्लिनर समीर देवकर (वय २५ रा. सिताबर्डी , नागपुर) हा पिडीत युवतीच्या शेजारी बसला.समिर याने पिडीत युवतीचे तोंड दाबुन धरून चाकुचा धाक दाखवला.

वाशिम : नागपुर ते पुणे मार्गावर धावणाºया खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लिनरनेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना ११ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्री दरम्यान घडली.
गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती ही पुणे येथील एका खासगी कंपणीत (एमआयडीसी परिसर) नोकरी करते. पिडीत युवती ही तिच्या बहिण्याच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. बहिणीचे लग्न आटोपुन ५ जानेवारीला दुपारी ४:३० वाजता नागपुर येथुन गुडविल ट्रॅव्हल्सने (स्लिपर कोच)  पुणे येथे परत निघाली होती.
प्रवासादरम्यान ट्रॅव्हलचा क्लिनर समीर देवकर (वय २५ रा. सिताबर्डी , नागपुर) हा पिडीत युवतीच्या शेजारी जाऊन तिच्याशी बिलगला असता युवतीने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु  समिर याने पिडीत युवतीचे तोंड दाबुन धरून चाकुचा धाक दाखवला. जीवाच्या भितीने घाबरलेल्या युवतीवर आरोपी समिर याने दोन वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले. ६ जानेवारीला ही ट्रॅव्हल्स सकाळी पुणे येथे पोहचल्यावर पिडीत युवतीने तीच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर पिडीत युवती आणी तिच्या मित्राने पुणे येथील ग्रामीण पोलीस स्टेशन गाठुन फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार समिर देवकर याचेविरूध्द भादंविचे कलम ३७६ (२) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
घटनास्थळ हे मालेगाव बाय पास (जि. वाशिम) असल्याने पुणे ग्रामीण पोलीसांनी सदर प्रकरण मालेगाव पोलीस स्टेशनला वर्ग केले. मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पुष्पलता वाघ यांचेकडे दिला. तपास अधिकारी वाघ यांनी यु.पी. ७३ ए ८०२० क्रमांक असलेली गुडविल ट्रॅव्हल्स कंपनीची बस जप्त करून ज्या बर्थवर ही घटना घडली त्या बर्थवरील कपडे जप्त केले. या घटनेतील आरोपी युवक हा घटनेच्या दिवशीपासुन पसार झालेला आहे. मालेगाव पोलीसांचे एक पथक आरोपीच्या शोधात पाठविण्यात आल्याचे ठाणेदार सोनोने यांनी सांगिले.

Web Title: 21-year-old girl from Gondiya raped in a running luxury bus way to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.