राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे; मुंबई आयुक्तालयातर्गंत ६२० पदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:35 PM2019-11-28T19:35:47+5:302019-11-28T19:40:45+5:30

तीन पोलीस अधीक्षकासह ६ उपअधीक्षकांचा समावेश

2144 more police posts for smooth traffic control in the state | राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे; मुंबई आयुक्तालयातर्गंत ६२० पदे

राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे; मुंबई आयुक्तालयातर्गंत ६२० पदे

Next
ठळक मुद्दे गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्य वाटपला हिरवा कंदील दाखविला आहे.उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनानुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत.

मुंबई - राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीला प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत. तीन उपायुक्त, ६ उपअधीक्षकांसह २७ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत त्यातील सर्वाधिक ६२० पदे देण्यात आलेली आहेत. गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्य वाटपला हिरवा कंदील दाखविला आहे.

उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनानुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागाची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. वाहतूक कोंडीची समस्यावर ठोस कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचिवल्या. त्यानुसार वाहतुक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मिती करण्याची सूचना होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनाधिकृतपणे सोडून दिलेली , बेवारस वाहने हटविणे, ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी संंबंधित अधिकारी, अंमलदारांनी विविध उपाययोजना राबवायच्या आहेत.
न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतुक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची २१४४ पदे दव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव यावर्षी २३ जानेवारीला प्रस्ताव गृह विभागाला सादर केला होता. त्या पदाची पोलीस घटकनिहाय वाटप करण्यात आलेली आहे.

नव्याने निर्माण करण्यात येणारी सवर्गनिहाय पदे
पद                                             संख्या
अधीक्षक                                       ३
उपअधीक्षक                                  ६
निरीक्षक                                      २७
सहाय्यक निरीक्षक                      ६३
उपनिरीक्षक                               १०८
सहाय्यक फौजदार                     १२६
हवालदार                                   ३७९
शिपाई                                     ११४३
चालक शिपाई                          २८९

Web Title: 2144 more police posts for smooth traffic control in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.