२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:13 AM2022-01-05T07:13:27+5:302022-01-05T07:13:37+5:30

ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाची कारवाई : पितापुत्र अटकेत

22 crore fake input tax credit racket exposed in Mumbai by GST Commissioner thane | २२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  सीजीएसटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी पितापुत्राच्या मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पितापुत्राला अटक करण्यात आली असून, २२ कोटी रुपयांच्या जीएसटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सेंट्रल इंटेलिजन्स युनिट, मुंबई सीजीएसटी झोन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे सीजीएसटी विभागाने कारवाई करत दोन व्यावसायिकांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघे हे नात्याने पितापुत्र आहेत. या दोघांच्या मे. शाह एंटरप्रायझेस आणि मे. यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगवेगळ्या फर्मचे कार्यालय मुंबईतील कांदिवली येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत. ११.८० आणि १०.२३ कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेऊन आणि पुढे देण्यात या कंपन्या गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा २०१७च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट आईटीसी बनावट संस्थांकडून मिळवत होत्या आणि ते या इतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या. दोघांना सीजीएसटी कायदाचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती ठाणे सीजीएसटी विभागाकडून देण्यात आली. 

प्रामाणिक करदात्यांशी स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि करचुकवेगिरी फसवणूक करणाऱ्या बनावट आयटीसी नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम तीव्र करणार आहे.
- राजन चौधरी, आयुक्त सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क 

Web Title: 22 crore fake input tax credit racket exposed in Mumbai by GST Commissioner thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी