Video - बापरे बाप! एअरपोर्टवर महिलेने बॅग उघडताच बाहेर आले तब्बल 22 साप, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:01 PM2023-05-01T13:01:47+5:302023-05-01T13:02:20+5:30
चेन्नई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकार्यांनी मलेशियाहून आलेल्या महिलेची बॅग उघडली तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे सांगितले जात आहे.
चेन्नई विमानतळावरचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. मलेशियाहून चेन्नई विमानतळावर पोहोचलेल्या एका महिला प्रवाशाचे सामान चेक-इन केले असता, सामानातून जे बाहेर आले ते पाहून कस्टम विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले. या घटनेच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
चेन्नई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकार्यांनी मलेशियाहून आलेल्या महिलेची बॅग उघडली तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे सांगितले जात आहे. बॅग उघडताच महिलेच्या पिशवीतून एकामागून एक 22 प्रकारचे साप बाहेर पडले आणि जमिनीवर सरकू लागले. हे साप वेगवेगळ्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पॅक करून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Tamil Nadu: On 28th April, a female passenger who arrived from Kuala Lumpur by Flight No. AK13 was intercepted by Chennai Airport Customs. On examination of her checked-in baggage, 22 snakes of various species and a chameleon were found & seized under the Customs Act,… pic.twitter.com/tQCmdElZkm
— ANI_HindiNews (@AHindinews) April 29, 2023
सर्व साप वेगवेगळ्या प्रजातीचे असल्याचे सांगितले जात आहे. 28 एप्रिल रोजी ही महिला फ्लाइट क्रमांक एके 13 ने मलेशियाची राजधानी क्वालालंपूरहून चेन्नई विमानतळावर पोहोचली, त्यानंतर काय झाले ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये अधिकारी काठीच्या मदतीने सापांना बाहेर काढताना दिसत आहेत.
कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तपासादरम्यान जे वास्तव समोर आले ते पाहून सगळेच अवाक् झाले. त्याचवेळी, सीमा शुल्क कायदा 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत सामानाची तपासणी करताना महिलेच्या बॅगेत सापडलेले विविध प्रजातींचे 22 साप आणि एक सरडा जप्त करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"