विकृतीचा कळस! 22 वर्षीय तरुणीला डांबून ठेवलं, तब्बल 8 महिने केला बलात्कार, नंतर विकलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 01:11 PM2021-03-01T13:11:32+5:302021-03-01T13:14:21+5:30
Crime News : तरुणीला तब्बल आठ महिने डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.
बरनाला - पंजाबच्या बरनालामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीला तब्बल आठ महिने डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी पीडितेने नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाचा नेत्याचाही समावेश असल्याची माहिती आता मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच कोर्टात तिचा जबाब नोंदवण्यात आला. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी धमकावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगून संरक्षण देण्याची विनंतीही केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 24 जून रोजी त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहणारी महिला बहिणीला फूस लावून एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भावाच्या घरी घेऊन गेली.
धक्कादायक घटनेने परिसरात खळबळhttps://t.co/DVtLkFoB0Z#Crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) February 27, 2021
नेत्यासोबत एक भोंदू बाबा आणि काही महिलांसह 20 ते 25 जण आधीच उपस्थित होते. तिथे तिला पिण्यासाठी शीतपेय दिले. ते प्यायल्यानंतर बहीण बेशुद्ध झाली. त्याच दिवशी तिच्यावर त्या नेत्याने आणि काही जणांनी बलात्कार केला. बहिणीला 17 दिवस बरनाला जिल्ह्यातील पंधेर गावात डांबून ठेवण्यात आलं. त्यानंतर संगरूरमधील एका गावात तीन दिवस डांबून ठेवले. बठिंडा येथे घेऊन गेले. तिथे जबरदस्ती तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या बदल्यात आरोपींनी 70 हजार रुपये घेतले होते, असा आरोपही तिच्या भावाने केला आहे.
Woman Helpline Scheme : महिला सुरक्षिततेसाठी सरकारने उचललं मोठं पाऊलhttps://t.co/yFy8oIWDUK#women#safety
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2021
बरनाला येथे तक्रार नोंदवली. पण तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. त्यावर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, भेट होऊ दिली नाही. बरनाला पोलीस विभागातील तीन कर्मचाऱ्यांनी बहिणीला धमकावल्याचं भावाने म्हटलं आहे. बहिणीला बठिंडामध्ये डांबून ठेवले होते. तिथे तिला तीन लाख रुपयांना विकणार असल्याची चर्चा सुरू होती. ते तिने ऐकले आणि कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. तिने आपल्या आईशी संपर्क साधला. तिला घेण्यासाठी गेलो असता, ती नशेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर बहिणीला सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नात्याला काळीमा! घटनेने परिसरात खळबळhttps://t.co/orV8LX9bxk#crime#Rape
— Lokmat (@MiLOKMAT) February 25, 2021