भिवंडीत दहा लाखांचा सफेद रॉकेलचा 22 हजार लिटरचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 07:38 PM2020-10-09T19:38:01+5:302020-10-09T19:38:57+5:30
Crime News : काल्हेर ग्रामपंचायत क्षेत्रातील जय मातादी कंपाऊंड येथील विजय छाया इमारतीच्या तळमजल्यावर प्लास्टिक व लोखंडी ड्रम व बॅरेल मध्ये हे सफेद रॉकेल साठवणूक केल्याचे आढळून आले.
भिवंडी - सफेद रॉकेल चा साठा करण्याबाबत कोणताही परवाना नसताना पर्यावरणास हानिकारक असलेल्या ज्वलनशील सफेद रॉकेलचा तब्बल १० लाख ७३ हजार २८० रुपये किंमतीचा २२ हजार ३६० लिटर चा साठा नारपोली पोलिसांनी गुरुवारी जप्त केला आहे.
काल्हेर ग्रामपंचायत क्षेत्रातील जय मातादी कंपाऊंड येथील विजय छाया इमारतीच्या तळमजल्यावर प्लास्टिक व लोखंडी ड्रम व बॅरेल मध्ये हे सफेद रॉकेल साठवणूक केल्याचे आढळून आले. त्याबाबत कोणताही परवाना चौकशीत त्यांच्याकडे आढळून न आल्याने कंटेनर क्रमांक MH 46 AR 2477 चा चालक लक्ष्मण चिमा डोंगरे ( रा.पारनेर अहमदनगर ) , टेम्पो क्रमांक MH 04 KF 324 चा चालक गोविंद राठोड ( रा.राहनाळ ता.भिवंडी ) , गोदाम चालक पंकज म्हात्रे व गोदाम मालक नयन पाटील ( दोघे रा. काल्हेर ) व माल विकत देणारा शैलेश दुधेला ( रा.मुंबई ) याना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सहा पो. नि. व्ही बी आव्हाड हे करीत आहेत.