तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 04:04 PM2020-06-16T16:04:06+5:302020-06-16T16:09:46+5:30
पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली.
इंदौर - डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंसने (डीजीजीआय) २२५ कोटी रुपयांचा कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली इंदौरचा उद्योगपती किशोर वाधवानी याला मुंबईहूनअटक केली. पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईनेअटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली.
वाधवानीला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली. डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला मुंबईहून इंदौर येथे आणले जात असल्याची माहिती केंद्रीय विभागाकडून मिळाली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, डीआयजीने आरोपीच्या नावाची खातरजमा केली नाही. तसेच विभागाने वाधवानीचा पाच दिवसांचा रिमांड घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कर चुकवेगिरी प्रकरणात पकडलेला आरोपी विजय नायर याच्याकडून वाधवानीची माहिती मिळाल्यानंतर विभागाने त्यांना दोनदा समन्स बजावले होते.
त्याच्याकडे एएए इंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे, जी विजय नायर चालवितो. विष्णू एजन्सी ही आणखी एक कंपनी अशोक डागा आणि अमित बोथरा चालवितात. हे दोघे पान - मसाले आणि गुटखा तयार करतात आणि नायरला देतात. नायर मध्य प्रदेशसह महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि इतर शेजारच्या प्रदेशात हा माल विकतो. शंभर रुपयांपैकी केवळ २० रुपयांचा व्यवसाय पारदर्शक होतो, तर उर्वरित ८० टक्के व्यवसाय करचुकवेगिरी करून केला जातो.
नायरने कबूल केले की, तो एक डमी व्यक्ती आहे आणि व्यवसाय हाताळणारा पडद्यामागे वाधवानी आहे. नायर यांच्या जबाबाची चौकशी करण्यासाठी आणि मास्टरमाईंडची पोल खोल करण्यासाठी वाधवानीची चौकशी केली जाणार आहे.
इंदौर - डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंसने (डीजीजीआय) 225 कोटी रुपयांच्या कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली इंदौरचा उद्योगपती किशोर वाधवानी याला मुंबईहून अटक केली.
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल
डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर
अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली
पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात
अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा