सराफा व्यापाऱ्यास बंदुकीच्या धाकावर २२.५० लाखांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:59 AM2020-03-14T00:59:21+5:302020-03-14T01:05:14+5:30
दुचाकीने घरी परत जात असलेल्या सराफा व्यापाऱ्यास तिघांनी अडवून गन कानशिलावर ठेवत त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये ३ किलो चांदी, अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख असा एकूण २२.५०लाख रुपये किमतीचा मुद्देमाल होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा ): दुचाकीने घरी परत जात असलेल्या सराफा व्यापाऱ्यास तिघांनी अडवून गन कानशिलावर ठेवत त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये ३ किलो चांदी, अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख असा एकूण २२.५०लाख रुपये किमतीचा मुद्देमाल होता. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणखैरी नांदा जुना रोडवर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता घडली.
खुशाल खाडे, रा. जुना नांदा यांचे कोराडी येथे खाडे ज्वेलर्स नामक दुकान आहे. त्यांनी रात्री ८.३०वाजता दुकान बंद केले आणि दुचाकीने घरी जायला निघाले. लोनखैरी रोडवर मागून दुचाकीने आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने त्यांच्या कानशिलावर गन ठेवली तर दुसयाने त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर तिघांनी नागपूरच्या दिशेने पळ काढला. त्या बॅगमध्ये १.२५ लाख रुपयांची तीन किलो चांदी, २० लाख रुपयांचे अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख अस एकूण २२.५० लाख रुपयांचा मुद्देमाल होता, अशी माहिती खुशाल खाडे यांनी खापरखेडा पोलिसांना दिली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.