नात्याला फासला काळिमा, अश्लील मेसेज पाठविण्यासाठी इंस्टाग्रामवर २४ अकाउंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 08:22 PM2018-09-15T20:22:35+5:302018-09-15T20:23:02+5:30

वांद्रे येथे राहणाऱ्या एका तरुणीला इंस्टाग्रामवरून अश्लील मेसेज सतत येत होते. २०१७ सालापासून मेसेजचा हा त्रास सुरु होता. एक अकाऊंट ब्लॉक केले की दुसऱ्या अकाऊंटवरून मेसेज यायचे.

24 accounts on Instagram for sending vulgar messages to the relative | नात्याला फासला काळिमा, अश्लील मेसेज पाठविण्यासाठी इंस्टाग्रामवर २४ अकाउंट 

नात्याला फासला काळिमा, अश्लील मेसेज पाठविण्यासाठी इंस्टाग्रामवर २४ अकाउंट 

Next

मुंबई - नात्यातील तरुणीला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या कक्ष  ११ च्या पथकाने शुक्रवारी अटक केली. अरबाज वाहिद खान (वय १९) असं या तरुणाचे नाव असून त्याने अश्लील मेसेज पाठविण्यासाठी इंस्टाग्रामवर तब्बल दोन डझन म्हणजे २४ अकाऊंट्स उघडल्याचे तपासात उघड झाले आहे. 

वांद्रे येथे राहणाऱ्या एका तरुणीला इंस्टाग्रामवरून अश्लील मेसेज सतत येत होते. २०१७ सालापासून मेसेजचा हा त्रास सुरु होता. एक अकाऊंट ब्लॉक केले की दुसऱ्या अकाऊंटवरून मेसेज यायचे.अखेर कंटाळलेल्या तरुणीने जानेवारी २०१८ मध्ये निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. तरीही नवीन अकाऊंटवरून मेसेज येणं सुरूच होते. निर्मल नगर पोलिस हे सायबर पोलिसांच्या मदतीने मेसेज पाठविणाऱ्याचा शोध घेत होते. कक्ष  ११  चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शरद झिने, चौगुले, शेळके, उपनिरीक्षक पारशी  यांच्यासह भांबीड, नावगे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. 

सायबर पोलिसांनी दिलेल्या तांत्रिक माहितीनुसार हा तरुण अकोला येथील असून वारंवार मुंबईत येत असल्याचे कळले. कक्ष ११ च्या पथकाने अकोला गाठले आणि अरबाज खान या तरुणाला ताब्यात घेतले. अश्लील मेसेज पाठविल्याची कबुली अरबाज दिली असून अरबाज हा क्रिकेटपटू आहे.  तो क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी मुंबईत येत असे. नातेवाईकांकडे वास्तव्यास असताना त्यांच्या घरातील तरुणी त्याला आवडायला लागली. मात्र ती अरबाजला प्रतिसाद देत नसल्याने तिला त्रास देण्यासाठी त्याने अश्लील मेसेज पाठविण्यास सुरुवात केली.

Web Title: 24 accounts on Instagram for sending vulgar messages to the relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.