गडचिंचले हत्या प्रकरणातील आणखी २४ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:18 AM2020-12-24T05:18:46+5:302020-12-24T05:19:11+5:30

Gadchinchale murder case : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या तिघांच्या हत्या प्रकरणात याआधी तब्बल २२८ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

24 more accused arrested in Gadchinchale murder case | गडचिंचले हत्या प्रकरणातील आणखी २४ आरोपींना अटक

गडचिंचले हत्या प्रकरणातील आणखी २४ आरोपींना अटक

Next

पालघर : डहाणू तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गडचिंचले येथील तीन व्यक्तींच्या हत्या प्रकरणात अन्य २४ आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. त्यांना डहाणू न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या तिघांच्या हत्या प्रकरणात याआधी तब्बल २२८ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यामध्ये आणखी १९ आरोपी व पाच अल्पवयीन मुले मिळून २४ जणांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता २४८ वर पोहाेचली आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत जामिनावर सुटका झालेल्यांची संख्या १०५ वर पोहोचली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये १२ आरोपी हे अल्पवयीन होते. त्यामध्ये आता पाचने वाढ होऊन ही संख्या १७ झाली आहे.  

Web Title: 24 more accused arrested in Gadchinchale murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.