भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:09 PM2021-11-05T12:09:29+5:302021-11-05T12:14:52+5:30

24 people have died : गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

24 people have died and several ill after consuming suspected spurious liquor in gopalganj | भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर

भयंकर! विषारी दारूने घेतला 24 जणांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ग्रामस्थांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Next

नवी दिल्ली - बिहारच्या गोपाळगंज आणि पश्चिमी चंपारण जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत विषारी दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. विषारी दारूने ग्रामस्थांचा बळी घेतला आहे. तसेच मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. गुरुवारी चंपारणच्या बेतिया गावामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गोपाळगंजमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये बिहारमध्ये दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोकांची यामुळे दृष्टी गेली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली, काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. पोलीस अधिकारी आनंद कुमार यांनी गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मुहम्मदपूर गावात काही लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. जोपर्यंत त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मृत्यू मागचं नेमकं कारण समजणार नाही. तसेच तीन टीम याचा तपास करत असल्याचं म्हटलं आहे. बिहारमधील बेतिया गावातील आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आठ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ऐन दिवाळीत अघटीत घडलं! 8 जणांचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा गंभीर आरोप

8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या काही नातेवाईकांनी विषारी दारू प्यायल्याने या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होती. बेतिया येथे काही जणांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले. त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि यातच 8 जणांचा मृत्यू झाला. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणेकडील तेलहुआ गावात ही घटना घडली. मृतकांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक 2, 3 आणि 4 मधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गावातील या सर्वांनी दारूचे सेवन केले आणि त्यानंतर रात्री उशीरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली. त्रास होत असलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मृतकांची नावे समोर आली असून यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहर सहनी, उमा साह, रमेश सहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 24 people have died and several ill after consuming suspected spurious liquor in gopalganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.