गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज तरुणाने घेतला गळफास लावून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 04:44 PM2021-12-11T16:44:05+5:302021-12-11T16:56:39+5:30

Suicide News : ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितले की, मृत तरुण आपल्या मैत्रिणीसोबत पार्टी करुन रात्री उशीरा घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर मानवने रात्री जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास प्रेयसीला फोन केला. मात्र, तिने उचलला नाही. 

24 year old man dies by suicide in mumbai after woman friend doesnt receive phone call | गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज तरुणाने घेतला गळफास लावून

गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज तरुणाने घेतला गळफास लावून

googlenewsNext

मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणाने प्रेयसीवर नाराज होत टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील देवनार परिसरात २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या पार्टीनंतर घरी पोहोचल्यानंतर प्रेयसीने फोन न उचलल्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरु आहे. मृत तरुणाचे नाव मानव ललवानी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितले की, मृत तरुण आपल्या मैत्रिणीसोबत पार्टी करुन रात्री उशीरा घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर मानवने रात्री जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास प्रेयसीला फोन केला. मात्र, तिने उचलला नाही. 

Video : अनैतिक संबंधातून जन्मलेलं नवजात बाळ आईने धावत्या लोकलमध्ये पिशवीत गुंडाळून ठेवलं 

'सॉरी पप्पा, मला माफ करा' असं लिहून पोटच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

 यानंतर त्याने रागाच्या भरात गळफास घेत आत्महत्या केली. मानवच्या पालकांना टेरेसवर मानव लटकलेला आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मानवच्या प्रेयसीचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवला आहे. 

Web Title: 24 year old man dies by suicide in mumbai after woman friend doesnt receive phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.