खामागावातील व्यापाऱ्याचे २५ लाख रुपये पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:15 IST2020-10-21T17:11:56+5:302020-10-21T17:15:14+5:30
Khamgaon, Theft, Crime News २५ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

खामागावातील व्यापाऱ्याचे २५ लाख रुपये पळविले
खामगाव : येथील महावीर चौकातील एचडीएफसी बँकेसमोर एका व्यापाºयाची २५ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. माहीती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे.
खामगाव येथील कृषी उद्योगाशी संबंधित एका व्यापाºयाने बुधवारी दुपारी महाविर चौकातील एचडीएफसी बँकेतून २५ लाख रुपयांची रोकड काढली व ते आपल्या कारद्वारे घरी जाण्यास निघाले. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांपैकी एकाने, ‘तुमच्या गाडीचे आॅईल गळत आहे’, असे व्यापाºयाला सांगितले. काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी व्यापारी गाडीमधून बाहेर आला असता, अज्ञात चोरट्यांनी गाडीतील रोख रक्कम लंपास केली. आपली रक्कम चोरी गेल्याचे लक्षात येताच व्यापाºयाने शहर पोलिस ठाण्यास वर्दी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.