२५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:26 PM2021-04-21T17:26:01+5:302021-04-21T17:26:58+5:30
Gangrape Case : झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे.
रांची : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे.
जमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सोमवारी उशिरा ही खळबळजनक घटना घडली. पीडित युवती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. इतक्यात पाच आरोपींनी रस्त्यात दोघांची वाट अडवली. त्यानंतर मित्राला मारहाण करुन त्यांनी घटनस्थळाहून पळवून लावले. तरुणीला एका तलावाजवळ नेऊन पाचही जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर पोलीस ठाणं गाठून तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सकाळ उजाडण्या आधीच पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी धनराज महतो उर्फ राज (२२), हरि महतो (३०), रंजीत महतो (२७), कालू महतो (२४) बुलेट महतो (२८) या पाच जणांना अटक करुन न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.