पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 04:52 PM2020-07-17T16:52:04+5:302020-07-17T16:54:51+5:30
पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पनवेल - पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका २५ वर्षीय तरुणीवर क्वारंटाईन असलेल्याच एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी लढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला.
संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा सूत्रांकडून सांगण्यात येत असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संभाव्य म्हणून दाखल झालेल्या एका तरुणीचा एका विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पीडित मुलगी आणि मुलगा एकाच परिसरात राहत असून मुलाने तिचा विनयभंग करून तिच्या गुप्तांगात बोटे घातल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं
निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
ताई मला वाचव! हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...
हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'