विक्रोळीत २५ वर्षे बांगलादेशींचे वास्तव्य; तिघांना पार्क साइट पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 09:47 AM2024-02-25T09:47:59+5:302024-02-25T09:48:42+5:30
विक्रोळीच्या पार्कसाईट येथील लोअर डेपो परिसरात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती समजली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतात अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. यात एका अशा नागरिकाचाही समावेश आहे. तो २५ वर्षांपासून याठिकाणी राहत असल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
विक्रोळीच्या पार्कसाईट येथील लोअर डेपो परिसरात बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती समजली. त्यानुसार पोलिसांनी दोन दिवस त्या परिसरात सापळा लावून युसूफ सोफान (५८), मोमीनउल्लक शेख (५२), उमेदउल्लंक नुरूलहक (६९) यांना ताब्यात घेतले. युसूफ काही वर्षांपूर्वी भारतात व्हिसा घेऊन आला होता. नियमानुसार २०२० साली त्याने पुन्हा जाणे अनिवार्य होते. तो भारतातच राहिला, तर मोमीनउल्लक हादेखील अशाच प्रकारे भारतात राहत होता.
भारतात घुसखोरी
या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली. उमेदउल्लंक नुरुलहक हा २५ वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आला आणि इथेच राहत होता.
त्याच्याप्रमाणेच अन्य बांगलादेशी नागरिक भारतात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.