‘इंडियन ओव्हरसीज’ची २६ कोटींची फसवूणक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:23 AM2023-01-04T10:23:06+5:302023-01-04T10:47:48+5:30

उपलब्ध माहितीनुसार, घरगुती सजावटीच्या सामानाची निर्मिती करणे तसेच मुंबईत चर्नी रोड, दादर येथील शोरूम्सच्या माध्यमातून त्याची विक्री करणाऱ्या जे-मार्क्स लाईफ स्टाईल कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ३१ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

26 crore fraud of 'Indian Overseas' | ‘इंडियन ओव्हरसीज’ची २६ कोटींची फसवूणक

‘इंडियन ओव्हरसीज’ची २६ कोटींची फसवूणक

googlenewsNext

मुंबई : घरगुती सजावटीच्या सामानाची निर्मिती करणाऱ्या मुंबईस्थित जे-मार्क्स लाईफ स्टाईल कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून कर्ज घेत त्याची परतफेड न करता त्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने बँकेची एकूण २६ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, घरगुती सजावटीच्या सामानाची निर्मिती करणे तसेच मुंबईत चर्नी रोड, दादर येथील शोरूम्सच्या माध्यमातून त्याची विक्री करणाऱ्या जे-मार्क्स लाईफ स्टाईल कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ३१ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणांसाठी कंपनीने कर्ज घेतले होते त्या कारणांसाठी कर्जप्राप्त रकमेचा वापर केला नाही.

या पैशांना अन्यत्र वळविले. तसेच कर्जाची परतेफड देखील कंपनीने केली नाही आणि याप्रकरणी जेव्हा बँकेने फॉरेन्सिक ऑडिट करण्याची तयारी केली, त्यावेळी कंपनीने सहकार्य केले नाही, अशी लेखी तक्रार इंडियन ओव्हरसीज बँकेचे मुख्य विभागीय व्यवस्थापक अजय टेंबेकर यांनी सीबीआयकडे केली आहे. 

Web Title: 26 crore fraud of 'Indian Overseas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.