उल्हासनगरात महिलेची २६ लाखांची 'ऑनलाईन' फसवणूक
By सदानंद नाईक | Published: September 21, 2022 04:59 PM2022-09-21T16:59:31+5:302022-09-21T17:00:03+5:30
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: सेवानिवृत्त असलेल्या कंचन तलरेजा यांना इंडियाफस्ट लाईफ लॉंग गॅरेटेड इन्कम प्लान पॉलिसी व एचडीएफसी पॉलिसी बंद करण्याचे आमिष दाखवून मनीष अग्रवाल व मनोज शर्मा यांनी तब्बल २६ लाख ६६ हजार १३७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ नेताजी चौक संजिवनी हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त कंचन तलरेजा कुटुंबासह राहतात. ४ ऑक्टोबर २०२१ साली तलरेजा यांना आयआरडीआयए दिल्ली येथील कंपनीत ट्रांजेक्सशन कर्मचारी असल्याचे मनीष अग्रवाल व मनोज शर्मा यांनी सांगितले. त्यांनी तलरेजा यांचा विश्वास संपादन केल्यावर, इंडियाफस्ट लाईफ लॉंग गॅरेटेड इन्कम प्लॅन पॉलिसी व एचडीएफसीची पॉलिसी बंद करण्याचे आश्वासन दिले. ४ ऑक्टोबर २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान मनीष अग्रवाल व मनोज शर्मा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी २६ लाख ६६ हजार १३७ रुपये स्वतःकडे वळते केले.
दरम्यान पॉलिसी बंद होऊन बँक पैसे खात्यात जमा न झाल्याने, आपली फसवणूक झाल्याचे कंचन तलरेजा यांना उघड झाले. त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून मनीष अग्रवाल व मनोज शर्मा यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.