२६ वर्षीय लोकप्रिय यूट्यूबर तरुणीचा अचानक मृत्यू; पोलिसांनी सांगितले मृत्यूचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:30 PM2024-07-12T13:30:18+5:302024-07-12T13:31:43+5:30

तरुणीच्या अचानक मृत्यूने तिच्या फॉलोअर्सलाही मोठा धक्का बसला आहे.

26 year old popular YouTuber girl dies suddenly The police told the cause of death | २६ वर्षीय लोकप्रिय यूट्यूबर तरुणीचा अचानक मृत्यू; पोलिसांनी सांगितले मृत्यूचे कारण!

२६ वर्षीय लोकप्रिय यूट्यूबर तरुणीचा अचानक मृत्यू; पोलिसांनी सांगितले मृत्यूचे कारण!

डिजिटल विश्वात 'पूकूमोन' या नावाने लोकप्रिय असलेली अरुणाचल प्रदेशातील व्लॉगर रूपची टाकू हिचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला आहे. रूपची टाकू ही २६ वर्षीय तरुणी भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. गुरुवारी तिचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर आपल्या व्हिडिओंच्या माध्यमांतून लोकप्रियता मिळवणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हिडिओ ब्लॉगिंगच्या माध्यमातूनही अनेकांनी आपले लाखो फॉलोअर्स जमवले आहेत. रूपची टाकू ही तरुणीही पूकूमोन या नावाने सोशल मीडियावर अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. मात्र आता तिच्या अचानक मृत्यूने तिच्या फॉलोअर्सलाही मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

रूपची टाकू हिच्या मृत्यूबाबत माहिती देताना इटानगरचे पोलीस अधीक्षक राजवीर सिंह यांनी सांगितलं की, चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्यानंतर रूपची टाकू हिला मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इन्या तातो हे करीत आहेत.

Web Title: 26 year old popular YouTuber girl dies suddenly The police told the cause of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.