Video : 26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा

By पूनम अपराज | Published: November 21, 2018 08:59 PM2018-11-21T20:59:00+5:302018-11-21T21:00:31+5:30

मला तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आलं असा बचावासाठी खोटा दावा ढोंगी कसाबने केला होता. 

26/11 Terror Attack: I had come to see the Big b's bungalow; False claim that Kasab had made a cheat | Video : 26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा

Video : 26/11 Terror Attack : मी बिग बींचा बंगला पाहायला आलो होतो; ढोंगी कसाबने केला होता खोटा दावा

Next
ठळक मुद्देढोंगी कसाबने आपला बचाव करण्यासाठी चौकशीत मी अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला पाहण्यासाठी आलो होतोदोन - तीन दिवसांपूर्वी रॉने मला पकडलं आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान माझ्या जखमी झालो हे भासवण्यासाठी माझ्या हाताला गोळ्या झाडून जखमा करण्यात आल्याशेवटी कसाबसारख्या भयानक दहशतवाद्याने फासावर चढण्याआधी महालेंकडे आप जीत गाये मैं हार गया अशी कबुली दिली.   

मुंबई -  26/11 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 10 दहशतवाद्यांपैकी एकच जिवंत सापडलेला दहशतवादी म्हणजे अजमल अमीर कसाब. या ढोंगी कसाबने आपला बचाव करण्यासाठी चौकशीत मी अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला पाहण्यासाठी आलो होतो. मात्र हल्ल्याआधी दोन - तीन दिवसांपूर्वी रॉने मला पकडलं आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान माझ्या जखमी झालो हे भासवण्यासाठी माझ्या हाताला गोळ्या झाडून जखमा करण्यात आल्या. नंतर मला तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आलं असा बचावासाठी खोटा दावा ढोंगी कसाबने केला होता. 

26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचं आरोपपत्र तयार करण्याचं मोठं अवघड काम रमेश महाले यांच्यामुळे मुंबई पोलिसांनी पेलता आलं. कसाबची महाले यांनी ८१ दिवस घड्याळ्याच्या काट्याची पर्वा न करता तासनतास चौकशी केली. महत्वाचं म्हणजे कसाबला फासावर चढवताना देखील कमालीची गुप्तता बाळगण्यात महाले यांचा वाटा होता. महालेंकडे स्वतःला वाचविण्यासाठी ढोंगी कसाबने मुंबईत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला पाहण्यासाठी आल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचा हा ढोंगी कसाबचा दावा फोल ठरला. शेवटी कसाबसारख्या भयानक दहशतवाद्याने फासावर चढण्याआधी महालेंकडे आप जीत गाये मैं हार गया अशी कबुली दिली.   

२६/११ मुंबईवर झालेला आतंकवादी हल्ला ते कसाबची फाशी - घटनाक्रम 

२६ नोव्हेंबर २००८ – कसाबसह दहा दहशतवाद्यांचा मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ –  १२. ३० वाजताच्या सुमारास कसाब पोलिसांच्या हाती लागला. अटकेनंतर नायर हॉस्पिटलमध्ये त्याची रवानगी

२९ नोव्हेंबर २००८ – दहशतवाद्यांच्या तावडीतील सर्व ओलिसांची सुखरूप सुटका. नऊ दहशतवादी ठार

३० नोव्हेंबर २००८ – कसाबचा पोलिसांसमोर कबुली जबाब

२७-२८ डिसेंबर २००८ – ओळखपरेड

१३ जानेवारी २००९ – २६/११च्या खटल्यासाठी न्या. एम. एल. तहलियानी  यांची नियुक्ती

१६ जानेवारी २००९ – कसाबचा खटला आर्थर रोड तुरुंगात चालवण्याचा निर्णय

५ फेब्रुवारी २००९ – कुबेर जहाजात सापडलेल्या वस्तूंवरील ठसे आणि कसाबचे डीएनए नमुने यांची जुळणी

२०-२१ फेब्रुवारी २००९ – महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे कसाबचा कबुली जबाब

२२ फेब्रुवारी २००९ – उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

२५ फेब्रुवारी २००९ – कसाबवर आरोपपत्र दाखल, आणखी दोघांवरही आरोपपत्र

१ एप्रिल २००९ – अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती

१५ एप्रिल २००९ – अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढून घेतले

१६ एप्रिल २००९ – अब्बास काझमी कसाबचे नवे वकील

१७ एप्रिल २००९ – न्यायालयात कसाबचा कबुलीजबाब खुला. मात्र, त्याने तो नाकारला

२० एप्रिल २००९ – सरकारी वकिलांचे कसाबवर एकूण ३१२ आरोप

२९ एप्रिल २००९ – कसाब हा अल्पवयीन नसल्याचा तज्ज्ञांचा दावा

६ मे २००९ –   कसाबवर ८६ आरोपांची निश्चिती. मात्र, कसाबने लावले फेटाळून

८ मे २००९ –  प्रथम साक्षीदाराची साक्ष, कसाबला ओळखले

२३ जून २००९ – हाफीज सईद, झकीउर रहमान लखवी यांच्यासह २२ जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

३० नोव्हेंबर २००९ – अब्बास काझमी यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढून घेतले

१ डिसेंबर २००९ – काझमींच्या जागी के. पी. पवार यांची नियुक्ती

१६ डिसेंबर २००९ – सरकारी वकिलांकडून २६/११ खटल्याचे कामकाज पूर्ण

१८ डिसेंबर २००९ – कसाबने सर्व आरोप फेटाळून लावले

३१ मार्च २०१० – खटल्यातील वाद-प्रतिवाद पूर्ण. तहलियानींनी ३ मेपर्यंत निर्णय राखून ठेवला

३ मे २०१० – कसाब दोषी. सबाउद्दिन अहमद आणि फहीम अन्सारी यांची दोषारोपातून मुक्तता

६ मे २०१० – कनिष्ठ न्यायालयात कसाबला फाशीची शिक्षा

२१ फेब्रुवारी २०११ – मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला

मार्च २०११ – उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कसाबचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

१० ऑक्टोबर २०११ – सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या शिक्षेची अंमलबजावणी रोखली. देवाच्या नावाखाली क्रूर कृत्य करण्यासाठी आपले रोबोसारखे ब्रेनवॉशिंग केले गेल्याचा दावा करत अल्पवयीन असल्याने फाशीची शिक्षा योग्य ठरत नसल्याचा कसाबचा दावा.

१८ ऑक्टोबर २०११ – सबाउद्दिन अहमद आणि फहीम अन्सारी यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली

३१ जानेवारी २०१२ – आपल्यावरील खटल्याची योग्य सुनावणी झाली नसल्याचा कसाबचा दावा

२३ फेब्रुवारी २०१२ – कसाब व त्याच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानातील नियंत्रण कक्षातून सूचना देणाऱ्या दहशतवाद्यांमधील संवाद सर्वोच्च न्यायालयात सादर. सीसीटीव्हीचे फुटेजही सादर.

२५ एप्रिल २०१२ – सर्वोच्च न्यायालयाने अडीच महिने निर्णय राखून ठेवला

२९ ऑगस्ट २०१२ – कसाबच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब. सहआरोपींच्या मुक्ततेवर सर्वोच्च न्यायालयही ठाम.

१६ ऑक्टोबर २०१२ - कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींना शिफारस. 

५ नोव्हेंबर २०१२ - राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला. 

८ नोव्हेंबर २०१२ - राज्य सरकारला राष्ट्रपतींचा निर्णय कळविण्यात आला. 

२१ नोव्हेंबर २०१२ – दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.

Web Title: 26/11 Terror Attack: I had come to see the Big b's bungalow; False claim that Kasab had made a cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.