रेल्वेत 28 जणांना नोकरी मिळाली! रोज गाड्या मोजण्याचे काम, महिन्यानंतर पगार आलाच नाही, झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:29 PM2022-12-20T14:29:16+5:302022-12-20T14:30:22+5:30

नवी दिल्लीत रेल्वे स्थानकात 28 जणांना नोकरी लागली. त्या  28 जणांनी एक महिना कामही केले. हे कामगार तमिळनाडू येथील होते, रोज हे कामगार फक्त स्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्या मोजायची काम करत होते.

28 people got jobs in the railways! The work of counting cars every day, the salary did not come after a month, there was a big revelation | रेल्वेत 28 जणांना नोकरी मिळाली! रोज गाड्या मोजण्याचे काम, महिन्यानंतर पगार आलाच नाही, झाला मोठा खुलासा

रेल्वेत 28 जणांना नोकरी मिळाली! रोज गाड्या मोजण्याचे काम, महिन्यानंतर पगार आलाच नाही, झाला मोठा खुलासा

Next

नवी दिल्लीत रेल्वे स्थानकात 28 जणांना नोकरी लागली. त्या  28 जणांनी एक महिना कामही केले. हे कामगार तमिळनाडू येथील होते, रोज हे कामगार फक्त स्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्या मोजायची काम करत होते. रोज हे कर्मचारी रेल्वे गाड्यांचे डबेही मोजायची काम करत होते, लोकांनी यावेळी यांची चौकशीही केली, पण त्यांनी सांगितले आम्हाला हेच काम दिले आहे. 

या कर्मचाऱ्यांची नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे त्यांना माहीत नव्हते. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा कडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना सांगण्यात आले की प्रवासी तिकीट परीक्षक (TTEs), वाहतूक सहाय्यक आणि लिपिक या पदांसाठी त्यांच्या प्रशिक्षणाचा हा एक भाग होता. यापैकी प्रत्येकाने रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी दोन लाख ते 24 लाख रुपयांपर्यंतची रक्कम भरल्याची समोर आले आहे.

रात्रभर घरात केली दारूची पार्टी, सकाळी नशेत पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य

या संदर्भात 78 वर्षीय एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. जून ते जुलै दरम्यान झालेल्या एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी फसवणूक करणाऱ्यांच्या टोळीने पीडितांना 2.67 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. सुब्बुसामी, एक माजी सैनिक, यांनी पीडितांना कथित फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात ठेवले होते, पण यातील काही माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

मदुराई येथील पीडित स्नेहिल कुमार यांनी माहिती दिली. “प्रत्येक उमेदवाराने विकास राणा नावाच्या व्यक्तीला पैसे देणाऱ्या सुब्बुसामीला दोन लाख ते 24 लाख रुपये दिले. राणा यांनी दिल्लीतील उत्तर रेल्वे कार्यालयात उपसंचालक म्हणून स्वत:ची ओळख करून दिली. पीडितांपैकी बहुतांश अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी असलेले पदवीधर आहेत. तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सुब्बुसामी म्हणाले, “माझ्या निवृत्तीपासून, मी माझ्या परिसरातील बेरोजगार तरुणांना कोणत्याही आर्थिक व्याजशिवाय योग्य नोकऱ्या शोधण्यात मदत करत आहे.

दिल्लीतील एमपी क्वार्टरमध्ये कोईम्बतूरचा रहिवासी असलेल्या शिवरामन नावाच्या व्यक्तीला भेटला होता. शिवरामन यांनी खासदार आणि मंत्र्यांशी त्यांची ओळख असल्याचा दावा केला आणि आर्थिक फायद्यांच्या बदल्यात बेरोजगारांना रेल्वेत नोकऱ्या देऊ केल्या. त्यानंतर सुब्बासामी नोकरीच्या शोधात तीन लोकांसह दिल्लीत आले आणि नंतर आणखी 25 लोक नोकरीसाठी त्यांच्यासोबत आले. हा नोकरीचा घोटाळा असल्याचे तपासात उघड झाले. 

Web Title: 28 people got jobs in the railways! The work of counting cars every day, the salary did not come after a month, there was a big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.