नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:20 IST2025-03-26T17:18:45+5:302025-03-26T17:20:06+5:30

Nashik News Updates: नाशिकमधील पंचवटी भागात असलेल्या भक्तिनिवासात एका २८ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 

28-year-old woman raped by six men at bhakta niwas in Nashik | नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार

नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार

Nashik News: पाच ते सहा दिवसांपूर्वी नाशिकच्या कुंभनगरीत आलेल्या एका २८ वर्षीय महिलेवर सहा नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या सहा नराधमांनी महिलेला चारचाकी वाहनात बसवून भक्तनिवासात नेले आणि तिथे जबरीने आळीपाळीने अत्याचार केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

१९ ते २३ मार्चदरम्यान हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्याने सहा अज्ञात नराधमांवर भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीबरोबर वाद, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

विश्वसनीय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा दिवसांपूर्वी परजिल्ह्यात राहणारी एक महिला पतीबरोबर कौटुंबिक वाद झाल्याने नाशिकमध्ये आली होती. रात्रीच्या वेळी ती पंचवटी परिसरात आली होती. 

हेही वाचा >> पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या तरुणीची टीसीनेच काढली छेड

त्याचेवळी संशयित आरोपींची तिच्यावर नजर पडली. त्यांनी महिलेला तुला तुझ्या गावाला नेऊन सोडतो, असे तसे सांगितले आणि तोंड दाबून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवून परिसरात एका भक्तनिवासात नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेबाबत छत्रपती संभाजीनगरपोलिस ठाण्यात गुन्हा होऊन तो पंचवटी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पाच जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिकमध्ये असलेल्या ओझर टाउनशिप परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली. आई कामावर गेल्यानंतर मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी पाच नराधम घरात घुसले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. 

या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम-६५(२), ७०(२), ३३२ (ब), ३५१ (३) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रीरनुसार, २, ९ आणि १६ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे घडल्याचे म्हटले आहे. संशयित कृष्णा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासह अन्य पाच जणांनी मुलीवर अत्याचार केले आणि कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: 28-year-old woman raped by six men at bhakta niwas in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.