२८ डिसेंबर रोजी आलोकनाथ यांच्या अटकेवर फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:09 PM2018-12-26T19:09:04+5:302018-12-26T19:10:43+5:30
प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर 20 वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी आलोकनाथांची अटकपूर्व जामिनावर न्यायालय २८ डिसेंबरला निर्णय देणार आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आपला निर्णय 26 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला होता.
मुंबई - सिनेसृष्टी गाजवणारे संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्या अटकेचा फैसला २८ डिसेंबर रोजी दिंडोशी सत्र न्यायालय ठरविणार आहे. त्यामुळे २८ डिसेंबरला आलोकनाथ यांना अटक होणार की नाही याबाबत निर्णय न्यायालय देणार आहे. प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर 20 वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी आलोकनाथांची अटकपूर्व जामिनावर न्यायालय २८ डिसेंबरला निर्णय देणार आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आपला निर्णय 26 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला होता.
आलोकनाथ यांच्यावर कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. आलोकनाथ आतापर्यंत कधीच हजर राहिलेले नाहीत.निर्मात्या विनता नंदा यांच्यावरील 20 वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणाऱ्या ओशिवरा पोलिसांनी अनेकवेळा आलोकनाथ यांना समन्स पाठवले होते. मात्र, ते कधीच हजर झाले नाहीत.
आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय कोर्टाने २६ डिसेंबरपर्यंत ठेवला राखून
Vinta Nanda case: Dindoshi session court to give order on anticipatory bail application of actor Alok Nath on 28 December.
— ANI (@ANI) December 26, 2018