हनी ट्रॅपमध्ये अडकले २९ जण; पाच गुन्ह्यांची उकल, उत्तर भारतातील टोळ्या सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:09 AM2022-07-18T06:09:30+5:302022-07-18T06:10:06+5:30

गेल्या वर्षी  सायबर फसवणुकीचे २ हजार ८८३ गुन्हे नोंदविण्यात आले.

29 people trapped in honeytrap five crimes solved gangs active in north india | हनी ट्रॅपमध्ये अडकले २९ जण; पाच गुन्ह्यांची उकल, उत्तर भारतातील टोळ्या सक्रीय

हनी ट्रॅपमध्ये अडकले २९ जण; पाच गुन्ह्यांची उकल, उत्तर भारतातील टोळ्या सक्रीय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची. पुढे मधाळ संवादातून अश्लील व्हिडिओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच व्हिडिओच्या आधारे खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीकडून उच्च शिक्षितांबरोबर राजकीय मंडळींनाही टार्गेट करण्यात येत आहे. यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान सेक्सटॉर्शनप्रकरणी २९ गुह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. यापैकी अवघ्या ५ गुह्यांची उकल झाली आहे.   

उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी  सायबर फसवणुकीचे २ हजार ८८३ गुन्हे नोंदविण्यात आले. यात सेक्सटॉर्शनचे ५४ गुन्हे नोंद असून, ३० गुंह्यांची उकल करण्यात आली. ५२ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच काही आमदारही या जाळ्यात अडकले होते. यावर्षी पहिल्या पाच महिन्यात सेक्सटॉर्शनप्रकरणी २९ गुन्हे दाखल झाले. यापैकी ५ गुह्यांची उकल करत दोघांना अटक झाली आहे. समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

उत्तर भारतातील टोळ्या

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या सीमावर्ती भागात अशा सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतले जाते. त्यांना हे गुन्हे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ही टोळी एखाद्याला सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळते.

Web Title: 29 people trapped in honeytrap five crimes solved gangs active in north india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.