यावल येथे ५ दिवसांत दुसरी हत्या; ३८ महिलेवर कुऱ्हाडीनं वार करून संपवलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 10:40 PM2022-08-27T22:40:57+5:302022-08-27T22:41:12+5:30
जावेद पटेल या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
जळगाव : तालुक्यातील चितोडा येथील तरूणाच्या खून प्रकरणास पाच दिवस उलटत नाही, तोच ३८ वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना शहरातील काझीपुरा वस्तीत शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडली. यात संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. यावल येथे पाच दिवसात हा दुसरा खून आहे.
नाजीया खलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून संशयित जावेद युनूस पटेल (रा. काझीवाडा) याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. महिलेस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेचे पती खलील काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जावेद पटेल या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.