३ मुलांना झाडाला बांधून केली मारहाण; मुलींची छेड काढल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 03:15 PM2021-12-17T15:15:16+5:302021-12-17T15:16:08+5:30
Molestation Case : गुरुवारी आपल्या तक्रारीत वडिलांनी आरोप केला की, “दुसऱ्या धर्मातील तीन मुले अनेकदा आमच्या वस्तीत येऊन आमच्या मुलींची छेड काढतात. काल रात्री माझी मुलगी घरी परतत असताना या मुलांनी तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
बरेली: परिसरातील मुलींची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली बुधवारी रात्री १९ वयोगटातील तीन मुलांना स्थानिकांनी पकडले, झाडाला बांधून बरेच तास मारहाण केली. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मुलींच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
गुरुवारी आपल्या तक्रारीत वडिलांनी आरोप केला की, “दुसऱ्या धर्मातील तीन मुले अनेकदा आमच्या वस्तीत येऊन आमच्या मुलींची छेड काढतात. काल रात्री माझी मुलगी घरी परतत असताना या मुलांनी तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
तक्रारीच्या आधारे, तीन तरुणांविरुद्ध SC/ST कायद्यासह IPC कलम 354 आणि 323 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्यांची सुटका करेपर्यंत मुलांना झाडाला बांधून कित्येक तास मारहाण केली, असे सूत्रांनी सांगितले.
त्यानंतर एका मुलाच्या आईच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर नोंदवण्यात आला, त्यात आरोप केला की, तिचा मुलगा बाजारात होता तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या मुलाला पकडून अनेक तास मारहाण केली. एक कथित व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी मुलांना कानाखाली मारताना दिसत आहे.
पोलिसांनी आयपीसीच्या कलम १४७, ३४१, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये चार ओळखीच्या आणि अनेक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.
एसपी (शहर) अखिलेश भदौरिया म्हणाले, “आम्ही सविस्तर तपास केला आणि आढळले की, एका स्थानिक मुलीचा विनयभंग केल्याबद्दल तीन मुलांना झाडाला बांधून अनेक तास मारहाण करण्यात आली. सर्व आरोपी आणि मुलगी प्रौढ आहेत. दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून आम्ही एफआयआर नोंदवला असून, आतापर्यंत तीन जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.”