वृध्द इसमाला मारहाण करून जबरीने लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना उत्तर प्रदेशातून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:31 PM2021-06-11T18:31:30+5:302021-06-11T18:42:52+5:30

Crime News : सदरच्या गुन्हयाच्या तपासामध्ये सफौ एस . सांळुके , पोहवा  पाटील , पोहवा पाटकर , पोहवा गहलो , पोहवा पवार , पोहवा कुदळे , पोहवा तांडेल , पोना कानु , पोना मोरे , पोशि पाटील, पोशि ढगे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे . लमूद अटक आरोपीकडून नवी मुंबई परिसरातील आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

3 criminals arrested from Uttar Pradesh for beating and robbing elderly person | वृध्द इसमाला मारहाण करून जबरीने लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना उत्तर प्रदेशातून अटक 

वृध्द इसमाला मारहाण करून जबरीने लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना उत्तर प्रदेशातून अटक 

Next

पनवेल -  एका वयोवृद्ध इसमास मारहाण करून लुटणार्‍या 3 गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी उत्तर प्रदेश येथून जेरबंद केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीतील अयप्पा मंदीर समोरील सेक्टर 13, नवीन पनवेल येथील जेष्ठ नागरीक बक शेखाजी दहातोंडे वय 85 वर्षे, यांना 3 अनोळखी इसमांनी त्यांचे दुकानामध्ये जबरदस्तीने घुसुन त्यांना लोखंडी पाईपने डोक्यावर मारहाण करून जखमी करून त्यांचे गळ्यातील 4 तोळ्याची सोन्याची चेन जबरीने खेचुन तसेच त्यांचेकडील ताब्यातील खाम जबरी चोल नेली म्हणुन खांदेश्‍वर पोलीस ठाणे, गुन्हा नोंद होता.

वयोवृद्ध इसमास त्यांचे सहते ठिकाणी रात्रीच्यावेळी घुसुन त्यांना अशाप्रकारे जबर मारहाण करून त्यांचे कडील सोन्याचे दागिने व पैसे जबरीने लुटुन नेणे या घटनेची संवेदशीलता पाहता सदरचा गंभिर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ), डॉ . बी . जी . शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , प्रविण पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , विनोद चव्हाण  यांनी गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना सूचना दिल्या होत्या. सदर गुन्हयांच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा , कदा 02 , पनवेल येथिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश कराड , सपोनि प्रविण फडतरे , पोउपनि वैभव रोंगे , पोउपनि मानसिंग पाटील व पथक यांनी सदरचा गुन्हा घडलेल्या ठिकाणी वेळोवेळी भेट देवुन सदर ठिकाणचे तसेच आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तपासुन तसेच बातमीदाराच्या मदतीने आरोपीने गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा निष्पन्न केली असता सदरचे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर राज्य - उत्तरप्रदेश येथे रेल्वेने पळुन गेल्याचे निष्पन्न झाले .

सदर आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने राज्य - उत्तरप्रदेश येथील चौरी पोलीस ठाणे , भदोई यांचेशी संपर्क साधुन सदर गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले . सदर ठिकाणी गुन्हे शाखा , कदार व खांदेश्‍वर पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक जिल्हा भदाई . राज्य - उत्तरप्रदेश येथे पाठवुन आरोपींना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात खालील 3 आरोपीना अटक करण्यात आली. त्यामध्ये शहानवाज मोहमंद अस्लम शेख उर्फ शानू वय 35 वर्षे , सेक्टर 4 , आसूडगांव , सहमत अमरजीत अन्सारी वय 23 वर्षे , धंदा रिक्षा चालक सेक्टर 7. कामोठे , रोशनकुमार गटरू नट वय 21 वर्षे , धंदा वेल्डींगकाम / वॉचमन, आदईगांव , ता . पनवेल , जि , रायगड , सदर तिन्ही आरोपीकडे सखोल तपास करून गुन्ह्यातील जबरीने चोरलेला माल तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा अशा एकुण 2,57,000 / - रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन , नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वयोवृध्द इसमाला जबरीने मारहाण करून त्यांचेकडील सोन्याची चेन व पैसे लुटल्याचा सदरचा गंभिर गुन्हा कौशल्यपुर्णरित्या उघडकीस आणला आहे . सदरच्या गुन्हयाच्या तपासामध्ये सफौ एस . सांळुके , पोहवा  पाटील , पोहवा पाटकर , पोहवा गहलो , पोहवा पवार , पोहवा कुदळे , पोहवा तांडेल , पोना कानु , पोना मोरे , पोशि पाटील .. पोशि ढगे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे . लमूद अटक आरोपीकडून नवी मुंबई परिसरातील आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title: 3 criminals arrested from Uttar Pradesh for beating and robbing elderly person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.