३ कोटी ४१ लाख रुपये कंपनीला परत मिळवून देण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 03:40 PM2019-07-18T15:40:47+5:302019-07-18T15:42:24+5:30
मॅन इन मिडल या सायबर फ्रॉडव्दारे फसवणूकीच्या प्रकारात सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने कंपनीला हे सर्व ३ कोटी ४१ लाख रुपये पुन्हा परत मिळवून देण्यात यश आले आहे़.
पुणे : पुण्यातील कंपनीने मेक्सिको येथील बँकेत ३ कोटी ४१ लाख रुपये पाठविले होते़. ज्या ई मेलद्वारे ही रक्कम पाठविली़. तो ई-मेल बनावट असल्याचे निदर्शनास असल्यानंतर कंपनीने सायबर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली़. मॅन इन मिडल या सायबर फ्रॉडव्दारे फसवणूकीच्या प्रकारात सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने कंपनीला हे सर्व ३ कोटी ४१ लाख रुपये पुन्हा परत मिळवून देण्यात यश आले आहे़. सायबर पोलीस ठाण्याने यापूर्वी अशाच प्रकारामध्ये पुण्यातील एका नामांकित कंपनीला त्यांचे ४ कोटी ५० लाख रुपये परत मिळवून देण्यात यश मिळविले होते़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एस आर सी केमिकल कंपनीने १४ जून रोजी १ लाख ६६ हजार २७६ डॉलर व १८ जून रोजी ३ लाख २९ हजार ४0,५़८५ डॉलर एचडीएफसी बँकेतून मेक्सिको येथील बँको मकेर्टाईल टेल नॉर्टे (बेनॉटे) बँकेमध्ये भारतीय चलनामध्ये ३ कोटी ४१ लाख रुपये पाठविले होते़. रक्कम पाठविल्यानंतर ज्या ई मेलद्वारे रक्कम पाठविली़. तो ई-मेल बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने या रक्कमेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात २० जूनला तक्रार दाखल केली होती़.
ही तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी तात्काळ मेस्किको येथी बँकेला, तक्रारदार यांचे अकाऊंट असणाऱ्या एचडीएफसी बँक तसेच स्वीफ्ट ट्रान्झॅक्शन जे पी मॉर्गन बँकेमार्फत झाल्याने त्यांना घडलेल्या घटनेबाबत व ही ट्रान्झॅक्शन फसवणुकीने झाल्याबाबत पुराव्यासहीत पत्रव्यवहार करुन त्याचा पाठपुरावा केला़. या प्रयत्नांमुळे ११ जुलै रोजी फसवणूक झालेली ३ कोटी ४१ लाख रुपये बँकेकडून एस आय सी केमिकल कंपनीला रिफंड करण्यात येणार असल्याचे पत्रव्यवहार करुन कळविले आहे़ .
.........
काय आहे मॅन इन मिडल
उद्योग क्षेत्रात पुरवठादार व मागणीदार यांच्या होणारा व्यवहार हा ई-मेलवर चालता़ या दोघांपैकी कोणत्याही एकाचा ई-मेल हॅक झाल्यास हॅकरला या दोघांमध्ये होणाºया संभाषणबाबत व आर्थिक व्यवहाराबाबत संपूर्ण माहिती मिळते़ याच माहितीचा वापर करुन हॅकर फसवणुक करतात़. जेव्हा पुरवठादार आणि मागणीदार यांच्यात एखादा व्यवहार ठरतो़. त्यावेळी हॅकर मागणीदाराला पुरवठादाराच्या ईमे आयडीसारखा, ज्यात नावाचे स्पेलिंगमध्ये सहजासहजी ओळखू न येणारा बदल करुन पुरवठादाराची ओळख धारण करुन मागणीदारास संपर्क केला जातो़. त्यास पुरवठादाराचे मुळ बँक खाते हे काही कारणास्वत वापरता येणार नसल्याचे सांगून हॅकर त्याचे बँक खाते पुरवठादाराचे म्हणून मागणीदारास पाठवितो़ ई-मेल आयडीमधील झालेला बदल मागणीदारास सहजासहजी लक्षात न आल्याने तो या बँक अकाऊंटमध्ये त्याने मागणी केलेल्या वस्तू अगर सेवासाठीची रक्कम पाठवितो़.
............................
मॅन इन मिडल सायबर फ्रॉडबाबत सुरक्षेचे उपाय
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपन्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारात ई मेलद्वारे संपर्क ठेवला जातो़. अशावेळी हे ई मेल हॅकर हॅक करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करण्याची शक्यता असते़. त्यापसून काळजी घेण्यासाठी सर्वांनी काही सुरक्षेचे उपाय योजने आवश्यक आहे़.
...............
* जे उद्योजक वस्तू अगर सेवांकरिता भारतातील किंवा भारताबाहेरील पुरवठादारांशी ई मेलवर संपर्कात आहेत़. त्यांनी पैसे पाठविण्यापूर्वी संबंधित पुरवठादाराशी फोनद्वारे संपर्क करुन बँक अकाऊंट नंबरची खात्री केल्यानंतरच ठरलेली रक्कम पाठवावी़.
* आपण ई मेल अकाऊंट सुरक्षित करुन वेळोवेळी त्याच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा़.
* आपणास जर अशा पद्धतीने खोटी ओळख धारण करुन बँक अकाऊंट बदललेबाबत ई मेल प्राप्त झाला असेल किंवा आपण त्यावरुन पैसे पाठविले असल्यास त्वरीत सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा़.
..........
कंपनीला ही रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल एस आय सी केमिकल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांची भेट घेऊन कामगिरीबद्दल अभिनंदन करुन आभार मानले़.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रसाद पोतदार यांनी केली आहे़.