अपघातात ३ जखमी, घरात सापडले ३ मृतदेह; रहस्यमय घटनेनं शहरात खळबळ, पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:28 IST2025-02-20T12:27:36+5:302025-02-20T12:28:55+5:30

प्रणयचा हा जबाब ऐकून पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलली, त्याने सांगितलेल्या ठिकाणी घरी पोहचले तेव्हा मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते.

3 injured in accident, 3 bodies found in house; Mysterious incident in kolkata, Pranay Dey and Prasun Dey Family Incident, police investigation | अपघातात ३ जखमी, घरात सापडले ३ मृतदेह; रहस्यमय घटनेनं शहरात खळबळ, पोलीस हादरले

अपघातात ३ जखमी, घरात सापडले ३ मृतदेह; रहस्यमय घटनेनं शहरात खळबळ, पोलीस हादरले

कोलकाता - टैंगरा परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील ६ जणांसोबत घडलेल्या या प्रकाराने पोलीस अधिकारीही हैराण आहेत. ३ जण रस्ते अपघातात गंभीर जखमी अवस्थेत सापडले तर उर्वरित तिघांचा मृतदेह घरात आढळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. ही आत्महत्या आहे की अन्य काही रहस्य यामागे दडलंय का याचा पोलीस शोध घेत आहेत.

कोलकाताच्या रूबी परिसरात एक वेगवान कार मेट्रो पिलरला धडकली. या अपघातात प्रणय डे, त्याचा भाऊ प्रसून आणि अन्य १६ वर्षीय युवक गंभीररित्या जखमी झाले. या सर्वांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी जेव्हा या घटनेतील अपघातग्रस्तांची चौकशी केली तेव्हा आणखी गूढ प्रकार समोर आला. प्रणय डे याने पोलिसांना सांगितले की, हा केवळ एक अपघात नाही तर विचारपूर्वक केलेला आत्महत्येचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर जो खुलासा झाला त्याने पोलीस हैराण झाले. माझ्या घरात आधीच तिघांनी आत्महत्या केल्याचं प्रणयने पोलिसांना सांगितले.

प्रणयचा हा जबाब ऐकून पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलली, त्याने सांगितलेल्या ठिकाणी घरी पोहचले तेव्हा मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. हे कुलूप तोडून पोलीस आतमध्ये गेली तेव्हा समोरील दृश्य पाहून पोलीस शॉक झाले. घरात ३ महिलांचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळून आला. त्यात प्रणय डे ची पत्नी आणि कुटुंबातील अन्य दोन महिलांचा समावेश होता. यात एक अल्पवयीनही होती. संपूर्ण घरात रक्ताचे डाग दिसत होते. हे सर्व प्रकरण रहस्यमय आणि संशयास्पद आहे. 

पोलिसांचा तपास सुरू, हत्या की आत्महत्या?

अधिकाऱ्यांनुसार हा प्रकार हत्या किंवा आत्महत्याही असू शकते. सध्या पोलीस याचा शोध घेत आहेत की ही कौटुंबिक आत्महत्या होती का अन्य मोठ्या षडयंत्राचा भाग आहे हे शोधलं जात आहे. घटनास्थळी पोलिसांचे पथक तपास करत असून हॉस्पिटलमधील जखमींचा जबाब नोंदवला गेला आहे. कौटुंबिक वाद, आर्थिक संकट अथवा अन्य काही कारण या सर्व अँगलने पोलीस घटनेचा तपास करत आहे. डे कुटुंबाचा प्रोटेटिव्ह लेदर ग्लोस कंपनी असून घरापासून काही अंतरावरच ही कंपनी आहे. प्राथमिक तपासात काही दिवसांपूर्वी डे कुटुंबाच्या भेटीसाठी काही लोक आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे लोक डे बंधूना त्यांच्या कारमधून नेताना दिसले. मध्यरात्री या दोघांना पुन्हा घरी सोडले होते त्यामुळे पोलीस हे प्रकरण उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Web Title: 3 injured in accident, 3 bodies found in house; Mysterious incident in kolkata, Pranay Dey and Prasun Dey Family Incident, police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.