नक्षलवाद्यांच्या आयईडीच्या स्फोटात ३ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 02:43 PM2021-03-04T14:43:27+5:302021-03-04T14:44:36+5:30
3 jawans martyred and 2 seriously injured in IED blast by Naxals : झारखंडचे जगुवार जवान आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान जखमी झाले.
झारखंडच्या जंगलात आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात तीन सुरक्षा दलाचे तीन जवान शहिद झाले तर दोन जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झारखंड जगुवार जवान, झारखंड पोलिसांची विशेष युनिट, पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील होयाहातू गावात गस्त घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ८.४५ वाजता आयईडीचा स्फोट झाला, त्यात झारखंड जगुवारचे तीन जवान शहीद झाले, झारखंडचे जगुवार जवान आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान जखमी झाले.
या स्फोटानंतर झारखंड पोलिस आणि सीआरपीएफतर्फे नक्षलवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीआरपीएफने सांगितले की, 'झारखंडचे राज्य पोलिसांचे झारखंड जगुवारचे ३ जवान शहिद झाले, तर २ जण गंभीर जखमी झाले. 197 बटालियन सीआरपीएफचा दोन जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमधील चकमक अर्धा तास सुरु होती आणि आता सर्च ऑपरेशन सुरू आहे.
जखमी जवान
कॉन्स्टेबल दीप टोपनो (पेग)
कॉन्स्टेबल निक्कू उरांव (लातेहार)
शहीद जवान
हेड कॉन्स्टेबल देवेंद्र कुमार पंडित (गोड्डा)
कॉन्स्टेबल हार्डवर शाह (पलामू)
कॉन्स्टेबल किरण सुरीन (सिमडेगा)
झारखंडच्या गुमला येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरूद्ध सुरू असलेल्या पोलिस कारवाईत गुमला पोलिसांना मोठा धक्का बसला होता. आयईडी स्फोटात एक सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला होता. यात त्याच्या दोन्ही पायाला जबरदस्त नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल उन्मूलन मोहिमेच्या वेळी चैनपूर ब्लॉकमधील कुरुमगड पोलीस स्टेशन परिसरातील केरागानी च्या जंगलात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर भूमिगत आयईडीने स्फोट घडवून आणला आणि त्यात सीआरपीएफचा एक जवान रोबिन कुमत गंभीर जखमी झाला. तर इतर काही जवान किरकोळ जखमी झाले होते.
Today at about 8:45 am, a pressure IED blast took place in the forest area of Hoyahatu village in West Singhbhum, Jharkhand. 2 jawans of Jharkhand Jaguar of State Police reportedly lost their lives while 2 received critical injuries. One jawan of 197 Battalion CRPF injured: CRPF
— ANI (@ANI) March 4, 2021
2 jawans of Jharkhand Jaguar unit lost their lives & 3 others injured in an IED blast planted by naxals in Jharjhara area. After the blast, massive search operation has been launched: Jharkhand Police
— ANI (@ANI) March 4, 2021