बिअर बार परवान्यासाठी सव्वा तीन लाखांची लाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक

By योगेश पांडे | Published: May 16, 2024 11:20 PM2024-05-16T23:20:42+5:302024-05-16T23:21:19+5:30

तक्रारदार युवकाला बिअर बार सुरू करायचा होता व त्यासाठई एफएल-३ परवाना हवा होता.

3 lakh 50 thousand bribe for beer bar license, State Excise Department officer arrested | बिअर बार परवान्यासाठी सव्वा तीन लाखांची लाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक

बिअर बार परवान्यासाठी सव्वा तीन लाखांची लाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक

नागपूर : बिअर बारच्या परवान्यासाठी सव्वा तीन लाखांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. रविंद्र लक्ष्मण कोकरे (४९) असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. 

तक्रारदार युवकाला बिअर बार सुरू करायचा होता व त्यासाठई एफएल-३ परवाना हवा होता. त्या युवकाने दस्तावेज पूर्ण देऊन रवींद्र कोकरेकडे अर्ज केला. ती फाईल मंजुर करून अधीक्षकांकडे पाठविण्यासाठी कोकरेने चार लाखांची मागणी केली. तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करीत गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सापळा रचला. चार लाखांऐवजी सव्वा तीन लाखात काम करण्याची कोकरेने तयारी दाखविली. 

ट्रॅफिक पार्कजवळ तरुणाकडून लाच घेताना कोकरे याला एसीबीच्या पथकाने अटक केली. दुसऱ्या पथकाने कोकरेच्या घराची झाडाझडती घेतली. पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम, विकास सायरे , राजू जांभूळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.कोकरेची संपूर्ण कारकिर्द वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: 3 lakh 50 thousand bribe for beer bar license, State Excise Department officer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.