पिंपरीत कस्टम ऑफिसर असल्याचे सांगून महिलेला ३ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 07:57 PM2019-07-05T19:57:18+5:302019-07-05T19:58:00+5:30
कस्टम ऑफिसर असल्याचे सांगून महिलेने तोतयागिरी केली
पिंपरी : कस्टम ऑफिसर असल्याचे सांगून महिलेने तोतयागिरी केली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मौल्यवान भेटवस्तूंचे आमिष दाखविले. ठकवणूक करून दोन लाख ९४ हजार आठशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. २३ मे ते २ जून २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा गुप्ता व शिवम पुजारी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कल्पना कृष्णा नाईक (वय ४५, रा. पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी कल्पना नाईक यांना इंटरनेट-व्हॉट्सअपच्या माध्यमातून मौल्यवान भेटवस्तूंचे आरोपींनी आमिष दाखविले. आपण कस्टम ऑफिसर असल्याचे आरोपी नेहा गुप्ता हिने सांगून तोतयागिरी केली. तसेच आरोपी शिवम पुजारी यांनी ठकवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी नाईक यांची ऑनलाइन फसवणूक केली. नाईक यांची दोन लाख ९४ हजार आठशे रुपयांची फवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.