जेएनपीए परिसरात एका कंटेनरमधून तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त, सीआययु विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 10:01 PM2022-10-01T22:01:03+5:302022-10-01T22:01:17+5:30

दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील एका सीएफएसमधून  रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला होता.

3 metric tons of raktchandan seized from a container in JNPA area, action of CIU department | जेएनपीए परिसरात एका कंटेनरमधून तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त, सीआययु विभागाची कारवाई

जेएनपीए परिसरात एका कंटेनरमधून तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त, सीआययु विभागाची कारवाई

Next

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीएच्या बंदरातून निर्यात करण्यात आलेल्या कंटेनरमधून सुमारे ३ मेट्रिक टन  रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.या जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटी आहे  सीआययु विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील एका सीएफएसमधून  रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला होता.त्याप्रकरणी चौकशी करताना एका कंटेनरमधुन  ३ मेट्रिक टन रक्तचंदन तस्करीच्या मार्गाने निर्यात करण्यात आले असल्याची माहिती मिळाली होती. 

दुबईत निर्यात करण्यात आलेला कंटेनर सीआययु विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेबेल अली बंदरातून परत मागविला होता.परत मागविण्यात आलेल्या संशयित कंटेनरची तपासणी करण्यात आली असताना त्यामध्ये सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन आढळून आले.रक्तचंदनाचा ३ मेट्रिक टनाचा साठा सीआययु विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: 3 metric tons of raktchandan seized from a container in JNPA area, action of CIU department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.