मीरारोडमधून ३ नायजेरियनना अमली पदार्थांसह अटक
By धीरज परब | Published: September 17, 2022 08:26 PM2022-09-17T20:26:05+5:302022-09-17T20:27:12+5:30
मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे .
शीतल नगर येथील शीतल साई इमारतीत नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे हवालदार प्रदीप टक्के याना मिळाली . वरिष्ठांना सांगितल्यावर अमली पदार्थ शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे , सहायक निरीक्षक विलास कुटे सह टक्के , इंगळे ,आव्हाड, घरबूडे तर मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चव्हाण , उपनिरीक्षक तानाजी सावंत सह गायकवाड , पाटील , खरमाटे , शिंदे , कवाणी व कात्यायनी यांच्या पथकाने सदनिकेवर छापा टाकला .
त्यावेळी सदनिकेत असलेल्या जॉन केनेथ ओकोलूजी (४९) , ईझे टोनी ( ४२) रा . हटकेश व फ्रंक नवाफोर (३४) ह्या तिघा नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले . जॉन याने शौचालयात लपवलेले १ लाख ६८ हजार किमतीचे १४ ग्राम कोकेन हे अमली पदार्थ तसेच घरातून १५ हजारांचे विना परवाना मद्य सापडले . पोलिसांनी ते जप्त केले असून तिघाहि नायजेरियन नागरिकांना १५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे . नावाफोर कडे भारतात वास्तव्य करण्यासाठीचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे .